विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदानाला राज्यपालांचा विरोध, ठाकरे सरकारला धक्का
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदान प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी विरोध केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रक्रियेला विरोध केल्याने अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार असंच चित्र आहे. महाविकास आघाडी […]
ADVERTISEMENT

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या आवाजी मतदान प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी विरोध केला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या प्रक्रियेला विरोध केल्याने अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार असंच चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांनी राज्यपालांना निवडणुकीच्या संदर्भात पत्र सादर करून निवडणूक घेण्याची संमती दिली होती. आज त्यावर राज्यपालांनी सरकारला पत्र लिहून उत्तर दिलं आहे.
हिवाळी अधिवेशन: ‘मी महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं भित्रं सरकार पाहिलेलं नाही’, फडणवीसांची तुफान टोलेबाजी
राज्यपालांनी काय म्हटलं आहे?