गुणरत्न सदावर्ते यांना अटक; शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलिसांची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसटी कर्मचारी आंदोलनामुळे चर्चेत आलेले प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १४१ ते १४९, ३५३, ३३२, ४५२, १२० ब, ४४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. याच निर्णयाचं एसटी कर्मचाऱ्यांकडून स्वागतही करण्यात आलं, मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (८ एप्रिल) काही एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी धडक दिली.

संतप्त कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं दगडफेक केली. त्याचबरोबर चप्पलाही भिरकावल्या. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी धाव घेत संपकरी कर्मचाऱ्यांना नियंत्रणात आणले. सुप्रिया सुळे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने तणाव कायम राहिला.

हे वाचलं का?

दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचं एक पथक रात्री वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी दाखल झाले. सुरूवातीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांना अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT