लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : परळीत पुन्हा मुंडे बहिण-भाऊ एकत्र; दिपोत्सवाला लावली हजेरी

मुंबई तक

पाहा LIVE Video:

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 09:27 PM • 22 Jan 2024

    परळीत पुन्हा मुंडे बहीण-भाऊ एकत्र; दिपोत्सवाला लावली हजेरी

    अयोध्येत आज झालेल्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ मंदिरात भाजपच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. परळीत काल झालेल्या शोभायात्रेत मुंडे बंधू भगिनी सोबत होते त्याप्रमाणे आजही दिपोत्सवासाठी आज वैद्यनाथ मंदिरातही सोबतच हजेरी लावली होती. यावेळी मंदिर परिसर दिपोत्सवाने उजळून निघाला होता.
  • 07:47 PM • 22 Jan 2024

    मनोज जरांगेचे अजित पवारांचा आव्हान, एकदा या दूध का दूध...

    धीर कशाला म्हणतात हेच आता मला कळेना. त्यापेक्षा अजित पवारांना सांगा, एकदा इथे या,आरक्षणाच्या विषयावरून बोलून दूध का दूध पाणी का पाणी करू, असे थेट आव्हानच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिले आहे. अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता. तसेच संवैधानिक पद्धतीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यास वेळ लागेल, त्यामुळे मनोज जरांगेंनी धीर धरावा, असे आवाहन अजित पवारांनी केले होते. त्यावर आता जरांगे पाटलांनी अजित पवारांना थेट आव्हान केले आहे.
  • 06:33 PM • 22 Jan 2024

    Uddhav Thackeray Live : रश्मी ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी केली गोदावरीची आरती

    उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये गेल्यानंतर आधी काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले. त्यानंतर ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह गोदावरी नदीच्या घाटावर पोहोचले. इथे ठाकरेंनी सपत्निक गोदावरीची आरती केली.
  • 05:17 PM • 22 Jan 2024

    उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या काळारामाची केली पूजा

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह काळारामाचे दर्शन घेतले. यावेळी प्रभू रामाची विधिवत पूजाही केली.
  • ADVERTISEMENT

  • 03:09 PM • 22 Jan 2024

    रामलल्लाची मूर्ती पाहून भक्तांचे डोळे पाणावले - योगी आदित्यनाथ

    आज रघूनंदन राघव रामलल्ला सिहासनावर विराजमान झाले आहेत. प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात प्रसन्नतेचे वातावरण आहे. रामभक्त आज गर्व आणि समाधानी आहेत. भारताला याच दिवसाची तर प्रतिक्षा होती. आज या दिवसाच्या प्रतिक्षेत तब्बल 500 वर्ष उलटली आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तसेच श्री राम जन्मभूमी विश्वातला पहिलं असे प्रकरण असेल जिकडे एका देशाच्या बहुसंख्य समाजाने आपल्याच देशात आपल्या आराध्या दैवताच्या जन्मस्थळावर मंदिर निर्माणासाठी इतक्या वर्षापर्यंत आणि विविध स्तरावर लढाई लढली असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
  • 01:12 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir Pran Pratishtha: रामलल्लाचा भव्य आणि दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरात भगवान श्री रामाचे बालस्वरूप असलेल्या रामलल्लाची मूर्ती पवित्र करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पार पडला.
  • ADVERTISEMENT

  • 01:12 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir Inauguration: बॉलिवूडपासून क्रिकेटपर्यंत अनेक दिग्गज उपस्थित

    Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. संपूर्ण देश या भव्य आणि दिव्य सोहळ्याचा साक्षीदार झाला. यावेळी, अयोध्येतील सोहळ्याच्या ठिकाणी बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.
  • 01:09 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir: राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न

    Ayodhya Ram Mandir Live Updates: राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अभिषेक विधीचे यजमान बनले आहेत.
  • 12:38 PM • 22 Jan 2024

    Ayodhya Ram Mandir Live: ऐतिहासिक क्षण... रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न, पाहा हे मनमोहक रुप

    Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अभिजीत मुर्हूतावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आली रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, पाहा राम मूर्तीचे मनमोहक रुप
  • 12:30 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir Live: पंतप्रधान मोदी चांदीचे छत्र घेऊन गर्भगृहात पोहोचले

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी चांदीचे छत्र घेऊन राम मंदिराच्या गर्भगृहात पोहोचले. यासोबतच प्राणप्रतिष्ठा विधीही सुरू झाला आहे.
  • 12:28 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir: मुकेश अंबानी म्हणाले - भगवान राम येत आहेत..

    Ayodhya Ram Mandir Live Updates: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी मंदिर परिसरात पोहोचले आहेत. मुकेश अंबानी मंदिर परिसरात पोहोचले आणि म्हणाले की, आज प्रभू राम येत आहेत. 22 जानेवारीला संपूर्ण देशात राम दिवाळी साजरी होणार आहे. त्याचवेळी नीता अंबानी म्हणाल्या की, हा ऐतिहासिक दिवस आहे.
  • 12:28 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir News Live: हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव

    Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पीएम मोदी राम मंदिर संकुलात पोहोचले, लवकरच अभिषेक सोहळा सुरू होणार आहे.
  • 12:27 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir Live: पंतप्रधान मोदी राम मंदिरात पोहोचले

    Ram Mandir Inauguration Live: पीएम मोदी राम मंदिर परिसरात पोहोचले आहेत. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे स्वागत केले. आता अभिषेकाची तयारी जोरात सुरू झाली आहे. 12.20 वाजता अभिषेक प्रक्रिया सुरू होईल. मोहन भागवत, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित आहेत. श्री रामजन्मभूमी मंदिरात सोनू निगमच्या भजनासह सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
  • 12:26 PM • 22 Jan 2024

    Ram Mandir: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोधकांनी यायला हवे होते: रामदास आठवले

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, 'अभिषेक सोहळ्यात जगभरातून लोक सहभागी होत आहेत.' कार्यक्रमाच्या राजकीय वादावर ते म्हणाले की, हा भाजपचा अजेंडा असता तर विरोधकांना निमंत्रित केले नसते. त्या सर्वांना आमंत्रणे मिळाली. प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकारण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. इथे विरोधी पक्ष यायला हवा होता. मात्र त्यांनी बहिष्कार टाकला.
  • 11:44 AM • 22 Jan 2024

    Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live: अयोध्या दिसत आहे राममय

    Ayodhya Ram Mandir Inauguration Updates: पंतप्रधान मोदी अयोध्येला पोहोचले आहेत. PMO ने एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधानांच्या विमानातून अयोध्येचे दृश्य टिपण्यात आले आहे. अयोध्या अतिशय सुंदर आणि राममय दिसत आहे.
  • 11:42 AM • 22 Jan 2024

    Ayodhya Ram Mandir Live: उमा भारतीही पोहोचल्या राम मंदिरात

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: भाजप नेत्या उमा भारती आणि शाहनवाज हुसैन हेही राम मंदिराच्या परिसरात पोहोचले आहेत. दोघांचे फोटो समोर आले आहेत. उमा भारती या तीन दिवस अयोध्येत होत्या. मात्र आजारपणामुळे त्या विश्रांती घेत होत्या.
  • 11:40 AM • 22 Jan 2024

    Ram Mandir Live: पंतप्रधान मोदी अयोध्येला पोहोचले

    Ayodhya Ram Mandir Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. ते प्रथम शरयू नदीत स्नान करतील. त्यानंतर नवे राम मंदिरात पोहोचून पूजेत सहभागी होतील. विधी प्रक्रिया काही वेळात सुरू होईल.
  • 11:39 AM • 22 Jan 2024

    Ram Mandir Pran Pratishtha: संघप्रमुख मंदिर परिसरात उपस्थित

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिरात पोहोचले आहेत. त्याचवेळी, माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा देखील मंदिर परिसरात उपस्थित आहेत.
  • 11:39 AM • 22 Jan 2024

    Ram Mandir Inauguration Live: रामलल्ला नवीन मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आले

    Ram Mandir Inauguration Live: रामलल्ला अयोध्येत बांधलेल्या तात्पुरत्या मंदिरातून नवीन मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आले आहेत. आतापर्यंत प्रभू राम तात्पुरत्या मंदिरात बसले होते. नवीन मंदिरात यथोचित विधी करून त्यांची प्रतिष्ठापना केली जाईल.
  • 11:35 AM • 22 Jan 2024

    Ram Mandir Pran Pratishtha: रितेश देशमुख म्हणाला- आम्ही भाग्यवान आहोत

    Ram Mandir Pran Pratishtha Live Updates: चित्रपट अभिनेता रितेश देशमुखने राम मंदिराच्या अभिषेकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणाला, 'जवळपास 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. आमचा रामलल्ला घरी परतला आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर मी हा ऐतिहासिक दिवस संपूर्ण देशासह साजरा करत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला हा क्षण पाहायला मिळत आहे.'
follow whatsapp

ADVERTISEMENT