भोंग्यांचा वाद! ‘दोन दिवसांत येणार नियमावली’; गृहमंत्र्यांनी वळसे-पाटील यांची माहिती

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात हा मुद्दा ज्वलंत बनला आहे. मनसेकडून राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आल्यानंतर गृहविभागाकडून भोंग्यांसंदर्भात नियमावली तयार केली जाणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. अजानच्या वेळी लावता येणार नाही हनुमान चालीसा! […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केल्यानंतर राज्यात हा मुद्दा ज्वलंत बनला आहे. मनसेकडून राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यात आल्यानंतर गृहविभागाकडून भोंग्यांसंदर्भात नियमावली तयार केली जाणार आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

अजानच्या वेळी लावता येणार नाही हनुमान चालीसा! नियम मोडल्यास थेट तुरुंगात

मनसेने भोंगे उतरवले नाही, तर हनुमान चालीसा वाजवण्याचं आव्हान दिलं आहे. सध्या राज्यात या मुद्द्यावर चर्चा झडत आहे. त्यातच नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी भोंगे आणि त्यांच्या आवाजासंदर्भात नियमावली जारी केली असून, आता गृहमंत्र्यांनी संपूर्ण राज्यासाठी नियमावली तयार केली जात असल्याचं सांगितलं.

भोंग्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडताना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, “यासंदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे बैठकीत निर्णय घेतील. या बैठकीत मार्गदर्शक नियमावली (गाईडलाईन्स) तयार केली जाईल. ही मार्गदर्शक नियमावली दोन दिवसांत जारी केली जाईल,” अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

“मार्गदर्शक नियमावलीचं स्वरुप कसं असेल, हे पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त ठरवतील. दुसऱ्या राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून नियमावली ठरवली जाईल.”

Raj Thackeray Pune: ..तर आम्ही शांत बसणार नाही, दगड आम्हालाही हातात धरता येतो: राज ठाकरे

महाराष्ट्रात धार्मिक तणाव वाढत असल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्री म्हणाले, “अशी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस सर्व ठिकाणी सज्ज आहेत. परिस्थितीवर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. मला वाटतंय की राज्यात कायदा-सुव्यवस्था आणि तणावाच्या परिस्थितीवर आम्ही पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे.”

राज ठाकरेंच्या उत्तर सभेतून काय साधलं?

सोशल मीडियावरून तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट शेअर केल्या जात असल्याच्या प्रश्नावरही वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं. “सोशल मीडियावरील पोस्टवर सायबर क्राईम नजर ठेवून आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल.”

राज्यातील परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी दुजोरा दिला. “मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, पण या विषयासंदर्भात ही भेट नाही. वेगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे,” पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp