इंधनाच्या वाढत्या दरांबाबत विचारला प्रश्न तेव्हा रामदेवबाबा भडकले आणि म्हणाले…..
योगगुरू रामदेवबाबा यांना इंधनाच्या वाढत्या दरांबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा ते चांगलेच भडकले. त्यासंदर्भातला एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये नऊवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. रामदेवबाबा यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना या वाढत्या इंधन दरांविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचा पारा चढला. काय म्हणाले रामदेवबाबा? ‘मला […]
ADVERTISEMENT

योगगुरू रामदेवबाबा यांना इंधनाच्या वाढत्या दरांबाबत प्रश्न विचारला गेला तेव्हा ते चांगलेच भडकले. त्यासंदर्भातला एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. मागच्या दहा दिवसांमध्ये नऊवेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. रामदेवबाबा यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्यांना या वाढत्या इंधन दरांविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांचा पारा चढला.
काय म्हणाले रामदेवबाबा?
‘मला असे प्रश्न मुळीच विचारायचे नाहीत, परत असा प्रश्न विचारशील तर खबरदार. गप्प बस, मी नाही तुझ्या प्रश्नाला उत्तर देणार तुला काय हवं ते कर.’ असं रामदेवबाबा यांनी पेट्रोल-डिझेलबाबत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला ठणकावून सांगितलं. काँग्रेसचे नेते इमरान प्रतापगढी यांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. तसंच रामदेवबाबा चिडल्याचा हा व्हीडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होतो आहे.