Bacchu Kadu यांना धक्क्यावर धक्के! बालेकिल्ल्यातच पराभवाची धूळ
Bacchu kadu panel loss in Election : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) वेगवेगळ्या कारणांमुळे राजकिय वर्तुळात चर्चेत असतात.सध्या कॉग्रेसकडून झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे ते चर्चेत आले आहेत. चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणूकीत बच्चू कडू (Bacchu Kadu Panel) पॅनेलचा पराभव झाला आहे. तर कॉग्रेसच्या (Congress) पॅनेलने या निवडणूकीत आघाडी घेत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे […]
ADVERTISEMENT
Bacchu kadu panel loss in Election : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) वेगवेगळ्या कारणांमुळे राजकिय वर्तुळात चर्चेत असतात.सध्या कॉग्रेसकडून झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे ते चर्चेत आले आहेत. चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणूकीत बच्चू कडू (Bacchu Kadu Panel) पॅनेलचा पराभव झाला आहे. तर कॉग्रेसच्या (Congress) पॅनेलने या निवडणूकीत आघाडी घेत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांची सोबत असतानाही बच्चू कडूंना मात्र मतदारसंघातल्याच सहकारात एंट्री घेता आली नाही. त्यामुळे नेमकं या निवडणूकीत काय झालं, हे जाणून घेऊयात. (bachchu kadu Panel has been defeated in chandur bazar kharedi vikri society election congress won)
ADVERTISEMENT
अधिवेशनातून ब्रेक घेत अचलपुरात मोर्चेबांधणी
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका खरेदी-विक्री संस्थेची निवडणूक झाली. आमदार, माजी मंत्री बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) अचलपूर मतदारसंघातच ही संस्था येते. त्यामुळे बच्चू कडूंच्या शेतकरी पॅनेलनं काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुखांच्या सहकार पॅनेलला आव्हान दिलं होतं.बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) मतदारसंघातली ही प्रमुख सहकार संस्था काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलं होते.यासाठी बच्चू कडूंनी मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातून ब्रेक घेत अचलपुरात मोर्चेबांधणी सूरू केली होती. त्यामुळे या निवडणूकीत सत्तापालट अशी चर्चा होती.
NCP: शरद पवारांच्या नागालँडमधील खेळीमागे ‘हे’ होतं कारण!
हे वाचलं का?
काँग्रेसची सत्ता कायम
राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार (Shinde Government) आल्यापासून कडूंनी सहकार क्षेत्रात बस्तान बसवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दुसरीकडे गेल्या काही काळात सहकार क्षेत्रातल्या धुरीणांमागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे काँग्रेस आणि प्रहार दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. १९ मार्चला १५ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणूकीचा निकाल सोमवारी 21 मार्चला लागला होता. या निकालात बच्चूकडूंना जोरदार झटका बसला. १२ जागा जिंकतं काँग्रेसनं सत्ता कायम राखली, तर कडूंच्या पॅनेलला केवळ 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
‘ही बेकायदेशीर गुढी उद्ध्वस्त करून…’, ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, जनतेला हाक
ADVERTISEMENT
दरम्यान या निवडणूकीत बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, प्रमोद कोरडे यांच्याा सहकार पॅनलने तालुक्यांच्या सहकार क्षेत्रावर आपली पकड अधिक मजबूत असल्याचं सिद्ध झालं. तर तीन वेळा आमदार होऊनसुद्धा, काही काळ मंत्रीपद मिळाल्यानंतर सहकारात एंट्री घेण्याचा कडूंचा मनसुबा काही पूर्ण झाला नाही.
ADVERTISEMENT
मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका
दरम्यान बच्चू कडूंना (Bacchu Kadu) बालेकिल्ल्यातच मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलंय. विधानसभेचं अधिवेशन सोडून कडूंनी निवडणुकीसाठी मतदारसंघात ठाण मांडलं होत. पण काँग्रेसकडून त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. त्यामुळे हा मोठा धक्का मानला जात आहे. तर हटके आंदोलनातून अपना भिडू बच्चू कडू अशी ओळख करणारे कडू नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. पण आधी आंदोलनामुळे चर्चेत असणारे बच्चू भाऊ (Bacchu Kadu) सध्या वेगवेगळ्या वादांमुळेच चर्चेत आहेत. मग ते कोर्टानं सुनावलेली शिक्षा असो की आसाममधील कुत्र्यांबद्दल केल्या वक्तव्यानंतर मागितलेली माफी. अशातच आता गावातल्याच निवडणुकीत कडूंचं पॅनेल पराभूत झालंय. त्यामुळे बच्चू कडूंच्या या पराभवाची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT