Badlapur Thane Crime News : पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या मित्राला पतीने डोक्यात हातोडी घालून संपवलं, नंतर...

मुंबई तक

बदलापूरमध्ये नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर हे पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, हे वारंवार घडत होतं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मित्राच्याच पत्नीवर केला नराधमाने अत्याचार

point

संतापलेल्या पतीने थेट मित्राला संपवलं

point

खून केल्यानंतर एक बनावही रचला

बदलापूरमध्ये काल एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आपल्या पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या मित्राला एका पतीने थेट संपवलं. या घटनेमुळे बदलापूरम हादरलं असून, या घटनेत अनेक नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?


घडलं असं की, एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर हे पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, हे वारंवार घडत होतं. पत्नीने सुरूवातीला हे पतीला सांगितलं नाही, मात्र नंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली. यानंतर पती संतापला आणि त्याने मित्राची थेट डोक्यात हातोडी घालून हत्या केली.

हे सगळं प्रकरण झाल्यावर हत्या उघड होऊ नये यासाठी एक बनाव रचण्यात आला. बाथरूममध्ये पडून आपल्या मित्राचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्याची पोलखोल झाली आणि पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Case : विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सुनावणीला सरकारी वकीलच अनुपस्थित?

बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी तिला दिली. यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. मात्र पत्नीने हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुष्कृत्याची माहिती दिली. यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं. तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली. तसंच अति दारू प्यायल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp