Maharashtra Din: मुंबईकरांच्या हृदयात ‘ठाकरे’च! नागरिकांनी सांगितला त्यांच्या मनातील प्रभावशाली नेता
मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम, सभा, सांस्कृतिक सोहळे आयोजित करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान, IANS आणि सी वोटरने महाराष्ट्राशी संबंधित एक सर्व्हे केला होता. जो आता समोर आला आहे. हे सर्वेक्षण जास्तीत मुंबईशी संबंधित आहे. याच सर्वेक्षणात एक असा सवाल विचारण्यात आला होता की, ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे. सर्वेक्षणात सी-वोटरने मुंबईकरांना […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम, सभा, सांस्कृतिक सोहळे आयोजित करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान, IANS आणि सी वोटरने महाराष्ट्राशी संबंधित एक सर्व्हे केला होता. जो आता समोर आला आहे. हे सर्वेक्षण जास्तीत मुंबईशी संबंधित आहे. याच सर्वेक्षणात एक असा सवाल विचारण्यात आला होता की, ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
सर्वेक्षणात सी-वोटरने मुंबईकरांना असा सवाल विचारला होता की, 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबईतील सर्वात प्रभावशाली राजकारणी कोण आहेत असे तुम्हाला वाटते?
सी-वोटरच्या या सर्वेक्षणात तब्बल 14 प्रश्न विचारण्यात आले होते. याच सर्वेक्षणादरम्यान शहरातील नागरिकांनी आश्चर्यकारक मतं मांडली आहेत. यावेळी राजकीय, सामाजिक आणि स्थानिक समस्यांबद्दल प्रश्न मुंबईकरांना विचारण्यात आले. त्यापैकी एक प्रश्न होता की,1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून मुंबईतील सर्वात प्रभावशाली राजकारणी कोण आहेत असे तुम्हाला वाटते?
हे वाचलं का?
दरम्यान, या प्रश्नाचं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार असेल असं राजधानी दिल्लीतील मीडियाला वाटत होतं. पण मुंबईकरांनी सर्वाधिक प्रभावशाली नेता म्हणून ज्या नेत्याला पसंती दिली ती व्यक्ती म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.
दिल्लीतील प्रसारमाध्यमांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा आणि दिग्गज प्रमुख निवडायला हवा असे वाटत असताना, मुंबईतील रहिवाशांचे मत होते की दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वात प्रभावशाली राजकारणी होते. उत्तरदात्यांचे दोन वर्गांमध्ये विभाजन करण्यात आले: महाराष्ट्रात जन्मलेले आणि राज्याबाहेर जन्मलेले. या दोन्ही वर्गांनी बाळासाहेब ठाकरेंना प्रचंड पसंती दिली.
ADVERTISEMENT
या प्रश्नांचे दोन गटाकडून उत्तर घेण्यात आलं. मराठी आणि अमराठी अशा दोन गटातील लोकांना हा सवाल विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर देतान दोन्ही गटांनी बाळासाहेब ठाकरे हेच मुंबईतील प्रभावशाली नेते होते.
ADVERTISEMENT
46% पेक्षा जास्त मराठी लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात प्रभावशाली नेता म्हणून निवड केली आहे. तर 50% पेक्षा जास्त अमराठी लोकांना देखील असंच वाटतं की, बाळासाहेब ठाकरे हेच प्रभावशाली नेते होते.
दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसमोर विरोधकांवतीने नेतृत्व करू शकणारे शरद पवार हे या सर्वेक्षणात पसंतीच्या बाबतीत बाळासाहेबांच्या जवळपासही नाहीत. फक्त 8.4% मराठी लोकांनी शरद पवारांना निवडले आहे. तर 4.5% अमराठी लोकांनी त्यांना निवडले आहे.
खरं तर शरद पवार हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही मागे आहेत. कारण देवेंद्र फडणवीस यांना मराठी आणि अमराठी या दोन्ही गटाने 9-9 टक्क्यांहून अधिक पसंती दिली आहे.
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही शरद पवार यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर आहेत. त्यांना 8% मुंबईकरांनी मतदान केले आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा आक्रमक हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरे पुढे नेऊ शकतात का?
याशिवाय विद्यमान मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना केवळ मराठी गटाकडून 4.5% मते मिळाली आहेत. तर अमराठी गटाकडून 6.1 टक्के पसंती मिळाली आहे. तर त्यांचे राबंधू आणि राजकीय वैरी असलेल्या राज ठाकरे यांना देखील बरीच कमी मतं मिळाली आहेत. मराठी गटातील 6.4 टक्के लोकांना वाटतं की, राज ठाकरे हे प्रभावशाली नेते आहेत. तर अवघ्या 3.6 टक्के अमराठी लोकांना वाटतं की, राज ठाकरे प्रभावशाली नेते आहेत.
दरम्यान, या सर्वेक्षणातील या प्रश्नाचा नेमका निकाल पाहिला सध्या महाराष्ट्रात सरकार असणाऱ्या महाविकासा आघाडीसाठी नक्कीच विचार करायला लावणारा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT