शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अँब्युलन्सने मुंबईत आणलं
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे म्हणजेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अँब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. सोमवारी दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला. ज्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होतं. आज सकाळी त्यांना पुढील […]
ADVERTISEMENT
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे म्हणजेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना औरंगाबादहून एअर अँब्युलन्सने मुंबईला आणण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. सोमवारी दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला. ज्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होतं. आज सकाळी त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी काय सांगितलं?
“संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तशी लक्षणं दिसत होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आलं आहे. संजय शिरसाट यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. त्यामुळे त्यांना औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची आधीची अँजिओप्लास्टी मुंबईत झाली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे” असंही हर्षदा यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट
गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना आधी औरंगाबाद आणि मग मुंबईत आणण्यात आलं आहे. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याचवेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत.
हे वाचलं का?
कोण आहेत संजय शिरसाट?
संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ज्यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला त्यापैकी एक संजय शिरसाट होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये संजय शिरसाट यांना मंत्रिपद दिलं जाईल अशाही चर्चा होत्या. मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं नाही. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिममधून विजयी झाले आहेत. सध्या मुंबईतल्या लीलावती रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी संजय शिरसाट हे रिक्षाचालक होते. १९८५ मध्ये त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २००० साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ मध्ये संजय शिरसाट यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. २००५ मध्ये ते पुन्हा नगरसेवक बनले होते. त्यानंतर २००९ साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT