काँग्रेस खासदार बाळू धानोरकर फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध नागपूरमधील धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ही तक्रार देण्यात आली आहे. धानोरकर यांच्या वक्तव्याची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.

खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रेदरम्यान केलेल्या भाषणामुळे वादात सापडले आहेत. बाळू धानोरकर यांनी भाषणात देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या विधानावर भाजप युवा मोर्चाने आक्षेप घेतला आहे.

हे वाचलं का?

Dhananjay Munde: ”शिरसाटांना मंत्री न करणाऱ्या अन् सुधीर भाऊंना चांगलं मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार”

खासदार बाळू धानोरकर काय म्हटलंय होतं?

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेसच्या वतीने आझादी गौरव यात्रेचं ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यातही आझादी गौरव यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्यातील भद्रावती येथे १३ ऑगस्ट रोजी बाळू धानोरकर यांनी बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.

ADVERTISEMENT

फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल बाळू धानोरकर काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहे. ब्राह्मणांच्या पोटी जन्माला येऊनच मोठे पद मिळते. जन्माला यायचं असेल, तर ब्राह्मणांच्याच पोटी यावं, आज ब्राह्मणांची पोर खारिक बदाम खात आहेत आणि बहुजनांची मुलं जांभया देत आहेत’, असं विधान धानोरकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि ब्राह्मण समाजाबद्दल केल्याचं भाजप युवा मोर्चानं तक्रारीत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मोठी बातमी! विनायक मेटेंच्या मृत्यूची सीआयडी चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

बाळू धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजात आणि समाजातील विविध जातींमध्ये तेढ निर्माण होऊन, समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जाणीवपूर्वक अशा विधानामुळे दंगे पसरू शकतात आणि कायदा सुव्यवस्था भंग होण्याची दाट शक्यता आहे.

एका खासदाराकडून अशा पद्धतीने शिवराळ भाषेत बोलणे हे अतिशय अशोभनीय, गैरवर्तनीनय आणि असंविधानिक आहे. भादंविच्या कलम १५३, १५३ अ, ५०४ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाने केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT