आमच्यामुळे सरकार आहे, काँग्रेस नेत्यांवर टीका करणं थांबवा – नाना पटोलेंचा राऊतांना टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युपीएचं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला आमच्या नेत्यांवर टीका करु नका असा सल्ला दिला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा संजय राऊतांना सुनावलं आहे. सरकार आमच्यामुळे आहे हे लक्षात असू द्या आणि काँग्रेस नेत्यांवर टीका करणं थांबवा असं म्हणत पटोलेंनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

ADVERTISEMENT

“संजय राऊत सातत्याने आमच्या नेत्यांविरोधात टीका करत आहेत. शिवसेना हा पक्ष युपीएचा भाग नाही तरीही ते वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत हे काही बरोबर नाही. आमच्यामुळे हे सरकार आहे हे लक्षात ठेवा आणि टीका करणं थांबवा. संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का असा प्रश्न मी विचारला होता. कालही शरद पवार आणि अमित शहांच्या भेटीवर संजय राऊतांनी ट्विट करुन माहिती दिली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखं वागत आहेत हे आम्ही म्हणत होतो ते स्पष्ट झालं.” नाना पटोले गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरुन बेबनाव सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. ३१ मार्चला शरद पवारांवर ब्रीड कँडी रुग्णालयात शस्त्रक्रीया होणार आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवारांना पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना ब्रीड कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. यामुळे शरद पवार यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT