लोखंडी कढईत लज्जतदार आमटी-भाकरी, हा महाप्रसाद पाहून तुमच्या तोंडालाही सुटेल पाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आणेगाव येथे प्रत्येक वर्षी श्री. रंगदास स्वामींची यात्रा भरवली जाते. पौष शुक्ल प्रतिपदेला ही यात्रा भरवली जाते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता एखाद्या देवस्थानाची यात्रा म्हणली की तिकडे येणाऱ्या भाविकांसाठी दिला जाणारा महाप्रसाद हा चर्चेचा विषय असतो.

ADVERTISEMENT

आणेगावच्या यात्रेत दिला जाणारा आमटी आणि भाकरीचा महाप्रसादही चर्चेचा विषय असतो. या महाप्रसादासाठी गावात प्रत्येक यात्रेला जय्यत तयारी केली जाते

ADVERTISEMENT

गावागावातून आलेल्या भाकऱ्यांची मिरणवूक काढून त्याचं योग्य पद्धतीने नियोजन केलं जातं.

ही आमटी तयार करण्यासाठी प्रामुख्याने तुरडाळ, खोबरे,जिरे,मोहरी,हळद,मीठ,मिरची,गूळ हे पदार्थ आणि २० ते २२ पदार्थांचं मिश्रण असलेला मसाला वापरला जातो. या यात्रेची आणि महाप्रसादाची जिल्ह्यात इतकी चर्चा असते की २०३५ सालापर्यंत या यात्रेत महाप्रसादात आमटीसाठी लागणाऱ्या मसाल्याचं बुकींग झालेलं आहे.

५० कार्यकर्ते या धगधगत्या लोखंडी कढईसमोर आमटी योग्य पद्धतीने होतेय की नाही याच्याकडे लक्ष देत असतात.

महाप्रसादासाठी आलेल्या भाविकांना मग या आमटी आणि भाकरीचा प्रसाद दिला जातो.

भुरका मारुन आमटी पिण्याची मजाच काही और असते…

यंदा कोरोनामुळे भाविकांना हा महाप्रसाद घरी घेऊन जाण्याची सोय करुन दिली होती.

मोठ्यांपासून लहानांपर्यंत प्रत्येक जण हा यात्रेत महाप्रसादाच्या लाईनीत उभा असलेला तुम्हाला दिसेल.

खास आमटी-भाकरीच्या या प्रसादासाठी अनेक भाविक या गावात हजेरी लावतात.

यंदा कोरोनामुळे पूर्वीसारख्या जेवणावळी उठल्या नाहीत…परंतू ग्रामस्थांनी आपली परंपरा मोडली नाही

पुढच्या वर्षी परिस्थिती नियंत्रणात येईल…

आणि पुन्हा नेहमीप्रमाणे जेवणावळी उठतील अशी आशा या गावकऱ्यांच्या मनात कायम आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT