वडिलांकडून अपहरणाची तक्रार, मुलीने FB वर शेअर केलं, ‘GOT MARRIED, पप्पा त्रास देऊ नका’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हाजीपूर (बिहार): बिहारमधील हाजीपूरमध्ये सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी तिच्या अपहरणाची एफआयआर खोटी असल्याचे सांगत आहे आणि पोलिसांकडे मदतीची याचना करत आहे. व्हायरल झालेल्या या व्हीडिओची पडताळणी केली असता असं आढळून आलं की, व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी गोरौल पोलिस स्टेशनच्या मलिकपुरा येथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी मुलीच्या वडिलांनी मुलीच्या अपहरणप्रकरणी गोरौल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

एकीकडे वडिलांनी मुलीच्या अपहरणाप्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर दुसरीकडे त्यांच्या मुलीने सर्वप्रथम तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर GOT MARRIED… चं स्टेटस टाकलं. त्यानंतर व्हीडिओ आणि फोटो टाकून स्वत:ला प्रौढ असल्याचे सांगून वडिलांवर छळ केल्याचा आरोप केला. वडिलांनी अपहरण झाल्याचा एफआयआर दाखल केलेला असता मुलीने मात्र, वडिलांपासून संरक्षण मिळावं यासाठी पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे.

सोशल मीडियावरील या व्हीडिओमध्ये मुलगी एका मुलासोबत दिसत आहे. मुलगी सांगते की, तिने स्वतःच्या इच्छेने तिला आवडणाऱ्या मुलाशी लग्न केलं आहे आणि ती आनंदी आहे. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न केल्याचे सांगून तिला त्रास देऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांना करताना दिसत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पुणे : गोड बोलून आईला शेतात नेलं अन् केली हत्या; वडिलांचाही तोडला अंगठा; मुलाचं क्रूर कृत्य

एफआयआर आणि त्यानंतर व्हायरल झालेल्या व्हीडिओवरून हे प्रकरण प्रेमप्रकरण आणि त्याच्याशी संबंधित वादाचे असल्याचे दिसते. सध्या पोलिसांकडे अपहरणाचा एफआयआर आणि त्यानंतर व्हायरल झालेला व्हीडिओही आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलगी मात्र बेपत्ता झाली आहे. त्यामुळे आता व्हायरल झालेल्या व्हीडिओमधील मुलीला शोधून काढणं आणि या संपूर्ण प्रकरणाचा योग्य तो छडा लावण्याचं आव्हान असणार आहे. तसेच याप्रकरणी आता मुलीच्या वडिलांची काय भूमिका असणार आहे हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT