मुलाच्या मृत्यूबद्दल विचारताच एकनाथ खडसेंचा महाजनांना फर्दापूरच्या गेस्ट हाऊसबद्दल प्रश्न
जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामधील टिकेनं आता वैयक्तिक रुप धारणं केलं आहे. या दोघांनी मागील दोन दिवसात टिका करताना आता एकमेकांच्या मुलांसह कुटुंबियांनाही वादात ओढलं आहे. त्यामुळे जळगावचं राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर गेलं आहे. नेमकं काय झालयं? महाजनांनी काय टीका केली? नुकतचं नंदूरबार येथे एका कार्यक्रमात बोलताना […]
ADVERTISEMENT

जळगाव : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यामधील टिकेनं आता वैयक्तिक रुप धारणं केलं आहे. या दोघांनी मागील दोन दिवसात टिका करताना आता एकमेकांच्या मुलांसह कुटुंबियांनाही वादात ओढलं आहे. त्यामुळे जळगावचं राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर गेलं आहे.
नेमकं काय झालयं? महाजनांनी काय टीका केली?
नुकतचं नंदूरबार येथे एका कार्यक्रमात बोलताना गिरीश महाज यांनी खडसेंना सगळं घरातचं पाहिजे. पत्नी मंदा खडसे दूध संघात चेअरमन, रोहिणी खडसे जिल्हा बँकेत चेअरमन ही घराणेशाही संपली पाहिजे असं म्हणतं खडसेंवर निशाणा साधला.
महाजनांच्या टीकेला खडसेंचे प्रत्युत्तर :
महाजन यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले, दुसऱ्याकडे चार बोटं दाखविताना स्वतःकडेही एक बोटं असतं लक्षात ठेवाव. गिरीश महाजनांच्या पत्नी साधना महाजन या गेल्या कित्येक वर्षांपासून आधी सरपंच आणि नंतर जामनेरच्या नगराध्यक्ष आहेत. दुर्दैवाने बर झालं गिरीश महाजांना मुलगा नाही, अन्यथा पत्नीसह मुलगा-सून सगळेच राजकारणात आले असते.
खडसेंच्या प्रत्युत्तरावर महाजनांचा पलटवार :
एकनाथ खडसेंची ही टीका महाजन यांच्या चांगलीचं जिव्हारी लागली. खडसेंना पुन्हा एकदा लक्ष्य करत ते म्हणाले, खडसे आजकाल काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाही. ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेताता. तर कधी मला चावट म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे.