मुंबईतील घटना! भाजप नेत्या सुलताना खान यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
–एजाज खान, मुंबई मुंबईतील मीरा रोड परिसरात भररस्त्यावर भाजपच्या महिला नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीये. भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्ष सुलताना खान यांच्यावर रविवारी रात्री ११ वाजता अज्ञातांनी चाकू हल्ला केला. या घटनेत सुलताना खान या जखमी झाल्या आहेत. भाजप नेत्या सुलताना खान या पतीसोबत डॉक्टरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांची […]
ADVERTISEMENT
–एजाज खान, मुंबई
ADVERTISEMENT
मुंबईतील मीरा रोड परिसरात भररस्त्यावर भाजपच्या महिला नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीये. भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्ष सुलताना खान यांच्यावर रविवारी रात्री ११ वाजता अज्ञातांनी चाकू हल्ला केला. या घटनेत सुलताना खान या जखमी झाल्या आहेत.
भाजप नेत्या सुलताना खान या पतीसोबत डॉक्टरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मोटारसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांची गाडी थांबवली आणि शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला.
हे वाचलं का?
सुलताना खान यांच्यासोबत काय घडलं?
अज्ञातांच्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सुलताना खान यांच्या पतीने झालेल्या प्रकाराविषयी माहिती दिलीये. रविवारी (१७ जुलै) रात्री ११ वाजता ते सुलताना खान यांच्यासोबत डॉक्टरला भेटायला निघाले होते. त्याचवेळी मीरा रोड परिसरात दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांच्या बाईक कारसमोर उभ्या केल्या.
त्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्यांनी सुलताना खान यांच्यासह त्यांच्या पतीला शिव्या देण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत असतानाच हल्लेखोरांनी सुलताना खान यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
ADVERTISEMENT
सुलताना खान यांचे पती काय म्हणाले?
सुलताना खान यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत सुलताना खान जखमी झाल्या आहेत. हल्ला झाल्यानंतर सुलताना खान यांच्या पतीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोक गोळा झाले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी जखमी सुलताना खान यांना जवळच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं.
ADVERTISEMENT
सुलताना खान यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांनाही याबद्दल माहिती विचारली. पोलिसांनी सुलताना खान यांच्याकडून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या घाबरलेल्या मनस्थितीत असल्यानं पोलिसांनी जबाब नोंदवला नाही.
सुलताना खान यांच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आज त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. दुसरीकडे पोलिसांनी असं म्हटलंय की, सुलताना खान यांचा जबाब नोंदवल्यावरच आरोपींवर कारवाई केली जाईल.
पक्षातंर्गत वादातून सुलताना खान यांच्यावर हल्ला?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सुलताना खान यांच्या हातावर जखमा झाल्या असून, ३ टाके पडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, सुलताना खान यांच्यावर कुणी हल्ला केला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पक्षातंर्गत वादातून हा हल्ला करण्यात आला असावा, अशी शंका सुलताना खान यांच्या पतीने व्यक्ती केलीये. काही दिवसांपूर्वी सुलताना खान यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे एक तक्रार दिली होती, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT