Landslide in Mumbai : …तरीही मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची बोचरी टीका
मुंबईत रविवारी विविध ठिकाणी भूस्खळनाच्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल-विक्रोळी-भांडूप-अंधेरी-कांदिवली अशा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये शहरात ३२ जणांनी प्राण गमावले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे. मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेली तरीही मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार […]
ADVERTISEMENT
मुंबईत रविवारी विविध ठिकाणी भूस्खळनाच्या घटना घडून लोकांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल-विक्रोळी-भांडूप-अंधेरी-कांदिवली अशा विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये शहरात ३२ जणांनी प्राण गमावले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली. या घटनेनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत २५ लोकं पावसामुळे मेली तरीही मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर असं म्हणत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.
मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..@OfficeofUT pic.twitter.com/3b0dkBHZlc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
जाणून घेऊया काल झालेल्या दुर्घटनांमध्ये कोणत्या ठिकाणी किती जणांनी आपले प्राण गमावले-
हे वाचलं का?
-
माहुल – १९
विक्रोळी – १०
ADVERTISEMENT
भांडूप – १
ADVERTISEMENT
अंधेरी पश्चिम – १
कांदिवली पूर्व – १
मुंबईत भुस्खलनाच्या दुर्घटना घडण्याआधी मालाड येथील कुरार भागात मेट्रोच्या कामांसाठी झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला विरोध करत आमदार अतुल भातखळकर मैदानात उतरले होते. ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांना नग्न करुन मारहाण केल्याचा आरोपही भातखळकरांनी केला होता.
अनैसर्गिक पावसामुळे मुंबईत Landslide, संजय राऊतांकडून BMC ची पाठराखण
दरम्यान आजच्या सामना अग्रलेखातूनही शिवसेनेने भूस्खलन प्रकरणात महापालिकेची पाठराखण केली आहे. मुंबईतली दुर्घटनांची दरड ही अनैसर्गिक पावसामुळे कोसळली. काहीही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं अशा शब्दांत शिवसेनेने टीकाकारांना उत्तर दिलंय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT