बारामतीचा शरद पवार धनगर समाजाचा सर्वात मोठा शत्रू : गोपीचंद पडळकरांची एकेरी टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली : राजकारणामध्ये धनगर समाजाने पुढे आले पाहिजे. बोलले पाहिजे. तुम्ही शांत राहून चालणार नाही, मी वाटलं तर खाली बसतो दुसरं कुणी तरी बोला. पण सगळ्यांनी एकजूट करा, असे म्हणतं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला एकजूट होण्याचे आणि एकजूट राखण्याचे आवाहन केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं. ते सांगलीतील आरेवाडी येथील दसरा मेळाव्यात बोलत होते.

ADVERTISEMENT

शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका :

दरम्यान यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, धनगर समाजाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू म्हणजे बारामतीचा शरद पवार आहे. पवार नावाच्या जातीनं आपलं रक्त शोषण करून पिल आहे. या राज्यात सर्वात जास्त मराठा जातीचे नुकसान करणारं कोण असेल तर शरद पवार आहेत. मग इतर समाजाची परिस्थिती फार वाईट आहे.

पडळकर पुढे म्हणाले, आपल्यातील काही लोकं उद्घाटन आणि जयंतीच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी शरद पवार हेलिकॉप्टरमधून आले होते. तेव्हा आपल्यातील डोक्यावरील टोपी खाली पडेपर्यंत हेलिकॉप्टरकडे पाहत… साहेब आले… साहेब आले… म्हणत होते. पण त्यांना सांगू इच्छितो की तुमचा साहेब नाही तर, बहुजनांचा कर्दनकाळ बसला आहे, अशी टीका पडळकर यांनी केली.

हे वाचलं का?

शरद पवारांनी कधी अहिल्यादेवीची जयंती केली आहे का? त्यांच्या घरात कधी अहिल्यादेवींचा फोटो बघितला का? सुप्रिया सुळे, रोहित पवार फुले घालत फिरत आहेत. यांनी काय केले आहे? याआधी कधी फिरलेत का ? असे सवाल पडळकर यांनी उपस्थित केले. पवारांचं सरकार सत्तेवर होते, त्यावेळी ओबीसीची फाईल जाग्यावरून हलली नाही. मात्र आपले सरकार सत्तेवर आल्यावर 72 हजार ओबीसी वस्तिगृह मंजूर करून दिली, असा दावाही पडळकर यांनी केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT