भाजपवरील टीकेसाठी आदित्य ठाकरेंनी आजचा दिवस का निवडला? केशव उपाध्येंनी सांगितलं कारण
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच राजकारण तापलं आहे. मंगळवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एमआयडीसीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना 5 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करारासाठी दिलेल्या निमंत्रणाचं एक पत्रही वाचून दाखविलं. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या याच आरोपांना आता भाजपनेही प्रत्युत्तर […]
ADVERTISEMENT

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच राजकारण तापलं आहे. मंगळवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एमआयडीसीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना 5 सप्टेंबर 2022 रोजी सामंजस्य करारासाठी दिलेल्या निमंत्रणाचं एक पत्रही वाचून दाखविलं.
आदित्य ठाकरे यांनी केलेल्या याच आरोपांना आता भाजपनेही प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:चे दोष दुसर्यांच्या माथी कसे मारायचे, हे ठाकरेंकडूनच शिकायला हवे. स्वत: काही करायचे नाही आणि दुसर्यांनी केले की, महाराष्ट्राच्या बदनामीचा प्रयत्न करायचा, हे त्यांनाच जमावे, असं म्हणतं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले केशव उपाध्ये?
मानलं बुवा आदित्यजींना, फॉक्सकॉन असो, एअरबस असो,मध्यप्रदेशातील उर्जा प्रकल्प असो की,बल्कड्रग पार्क, सॅफ्रान या सार्या प्रकल्पांबाबत आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टो 2022रोजी सविस्तर पत्रपरिषद घेऊन सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती.
ही घ्या लिंक :