कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : राजू शेट्टींचं मन वळवण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचं वातावरण रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना तिकीट दिलं असून काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी शिवसेनाही उत्सुक होती, परंतू पक्षनेतृत्वाने माघार घेण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. अशा […]
ADVERTISEMENT
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर राज्यातील कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचं वातावरण रंगायला सुरुवात झाली आहे. भाजपने या पोटनिवडणुकीत सत्यजित कदम यांना तिकीट दिलं असून काँग्रेसने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या जागेवर निवडणुक लढवण्यासाठी शिवसेनाही उत्सुक होती, परंतू पक्षनेतृत्वाने माघार घेण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत.
ADVERTISEMENT
अशा परिस्थितीत भाजप नेत्यांनी या पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरातील भाजप नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेत भाजप उमेदवाराला पाठींब्याची मागणी केली आहे.
Kolhapur Bypoll: भाजपने कोल्हापुरातून सत्यजित कदम यांनाच तिकीट का दिलं?
हे वाचलं का?
भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार सूरेश हाळवणकर आणि आजी-माजी पदाधिकऱ्यांनी राजू शेट्टींची भेट घेत त्यांच्या पाठींब्याची मागणी केली आहे. या बैठकीनंतर राजू शेट्टींनी कार्यकर्त्यांशी विचारविनीमय करुन पाठींब्याबद्दल निर्णय जाहीर करु असं सांगितलं आहे. भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीच्या सोबत गेलेल्या राजू शेट्टींची गेल्या अडीच वर्षांच्या काळात राज्य सरकारवर नाराजी घट्ट झालेली पहायला मिळते आहे.
कोल्हापूर : शिवसेनेनं बालेकिल्लाच दिला ‘काँग्रेस’ला; भाजपला होणार फायदा?
ADVERTISEMENT
उस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा मुद्दा प्रत्येक वेळी राजू शेट्टींनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चाही सुरु होत्या. अशातच राजू शेट्टींच्या नाराजीचा वापर करुन भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ५ एप्रिलला पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर राजू शेट्टी हा निर्णय जाहीर करणार आहेत.
ADVERTISEMENT
दुसरीकडे शिवसेना नेतेही पक्षाने माघार घेण्याच्या निर्णयावर नाराज असल्याचं कळतंय. माजी आमदार राजेश क्षीरसागरही नाराज असल्याचं कळतंय. आज कोल्हापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे ज्यात क्षीरसागर उपस्थित राहतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे नाराज शिवसैनिकांचा फटकाही या निवडणूकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.
सकाळी उन्हाच्या झळा, सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस; कोल्हापुरांची फजिती
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT