राज्यपाल कोश्यारींना केवळ एखाद्या विधानावरुन कोंडीत पकडू नये : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई तक

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई : भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी केलं. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

एकमेकांच्या राजकीय नेत्यांवर, आदर्श व्यक्तींवर केलेल्या टीकेवरून राज्यात आधीच वातावरण तापलं होतं. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केलं, त्यावरून वाद निर्माण झाला. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत राज्यापालांच्या विरोधात आंदोलन केलं. तर भाजपकडून मात्र यावर सावध प्रतिक्रिया देण्यात येत आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे :

भारतीय जनता पक्षाचे 18 कोटी कार्यकर्ते छत्रपती शिवादी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात. छत्रपती शिवरायांचे इतिहासातील महत्व कोणीही कमी करु शकत नाही.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला आहे. शिवरायांच्या जन्मस्थानी नमन करण्यासाठी ते वायाच्या 79 व्या वर्षी शिवनेरी किल्ला पायी चढून गेले. पदवीदान समारंभात जे वक्तव्य झाले त्याचे कोणीही समर्थन करत नाही. परंतु, केवळ एखाद्या विधानावरुन त्यांना कोंडीत पकडू नये.

हे वाचलं का?