Maharashtra weather : राज्यावर मोठं संकट, उन्हाळ्यात 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार

मुंबई तक

Maharashtra weather : राज्यात सध्या हवामानात उलटफेर जाणवू लागलेत. काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे, तर काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज जारी केला आहे. अशातच जाणून घेऊयात 30 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

ADVERTISEMENT

Maharashtra weather
Maharashtra weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात सध्या हवामानात उलटफेर

point

जाणून घेऊयात 30 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात सध्या हवामानात उलटफेर जाणवू लागलेत. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, तर काही ठिकाणी हवामान विभागाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. अशातच राज्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, जाणून घेऊयात 30 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.  

हे ही वाचा : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब..., सुनील तटकरेंच्या कार्यक्रमात काय घडलं?

कोकण 

कोकण विभागात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाचा अंदाज जारी केला. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानासह उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र  

मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला. राज्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगरासह सर्वच जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत सोमवारी अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तर छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा यलो अलर्ट जारी केला. 

हे वाचलं का?