डॉक्टरच करत होता रेमडेसिवीरचा काळा बाजार, सापळा रचून पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यवतमाळ: कोरोनावरील (Corona) उपचारात प्रभावशाली समजल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाची अवैधपणे विक्री करणाऱ्या टोळीला यवतमाळ (Yavatmal) पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून रेमडेसिवीरच्या 9 व्हायल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून कळंब पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

डॉक्टर अक्षय तुंडलवार, सावन पवार, सौरभ मोगरकर, बिलकीस बानो अशी अटक केलेल्या चारही आरोपींची नावं असल्याचं समजतं आहे.

खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!

हे वाचलं का?

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब इथे एक डॉक्टर आणि औषध विक्रेता रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करत विक्री करत असल्याची माहिती यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या टीमला मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागच्या मदतीने सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला संबंधित टोळक्याकडे पाठवून रेमडेसिवीरची मागणी करण्यास सांगितले. यावेळी संबंधित टोळक्याला कोणताही संशय न आल्याने त्यांच्यातील व्यवहार देखील पक्का झाला. यावेळी विक्रेत्यांनी रेमडेसिवीर घेण्यासाठी ग्राहकाला कळंबमधील ठरलेल्या जागेवर बोलावले. दरम्यान, संबंधित ग्राहकाला रेमडेसिवीर इंजेक्शन देत असतानाच देताच पोलिसांनी डॉक्टर आणि विक्रेत्याला रंगेहाथ पकडलं.

ADVERTISEMENT

नर्सने चोरून विकले रेमडेसिवीर, घरातही सापडले ‘एवढे’ इंजेक्शन

ADVERTISEMENT

यावेळी पोलिसांनी तात्काळ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केलं. तसंच त्यावेळी त्यांनी आरोपी डॉक्टर आणि औषध विक्रेत्याची कसून चौकशी केली असता या रॅकेटमध्ये यवतमाळ मधील इतरही काही जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी यवतमाळ येथील सौरभ मोगरकर आणि बिलकीस बानो यांनाही अटक केली. यावेळी त्यांनी 9 व्हायलसह 2 लाखाचा मुद्देमाल देखील जप्त केला.

नर्सने चोरून विकले रेमडेसिवीर

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर रेमडेसिवीर या इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या परभणी (Parbhani) जिल्हा शासकीय रुग्णालयातील नीता केशव काळे नामक नर्ससह दत्ता शिवाजी भालेराव (वय 21) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका पथकाने 21 एप्रिलला सापळा रचून अटक केली आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा सुरु आहे. रुग्णांसह त्यांचे कुटुंबीय या इंजेक्शनसाठी वणवण फिरत आहेत. या स्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयातील काही व्यक्ती इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याच्या बाबी समोर आल्यानंतर परभणी पोलिसांनी सापळा रचून बेकायदेशीर इंजेक्शन विकणाऱ्यांना अटक केली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अटक केलेल्या महिलेच्या घरावर देखील छापा मारला. यावेळी घराची झडती घेतली असता त्यांना 75 हजार रुपये रोख व 7 रेमडेसिवीर इंजेक्शन आढळून आले. या परिचारिकेने जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीतील कोव्हिड सेंटरमूधन ते इंजेक्शन चोरल्याचं कबूल केलं आहे. या पथकाने महिलेकडून मोबाइल देखील जप्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT