ठाकरे-शिंदे गटाचा राडा! BMC ने सगळ्यांच्या कार्यालयांना ठोकले टाळे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेनं सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यालये सील केली आहेत.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे दोन गट (ठाकरे गट आणि शिंद गट) बुधवारी सायंकाळी मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून भिडले. दोन्ही गटांमध्ये जोरदार राडाही झाला. त्यामुळे महापालिकेत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या नेते, कार्यकर्त्यांना बाहेर काढत कार्यालय बंद केलं.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनिल परबांनी लढवला किल्ला… शिंदेंचंही प्रत्युत्तर

हे वाचलं का?

बुधवारी झालेल्या या घटनेनंतर मुंबई महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांना टाळे लावण्याचा निर्णय घेतला. पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या चहल यांनी माहिती दिली.

मुंबई महापालिका मुख्यालयात बुधवारी (28 डिसेंबर) घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी महापालिका प्रशासनाला सूचना केली होती. त्यानंतर प्रशासनाने पाऊल उचललं आहे. मुख्य इमारतीतील ग्राऊंड फ्लोअरला सर्व राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. ही कार्यालये सील करण्यात आली आहेत, अशी माहिती चहल यांनी दिली.

ADVERTISEMENT

Yogesh Bhoir : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक, प्रकरण काय?

ADVERTISEMENT

bmc तील कार्यालयावरून शिंदे -ठाकरे गटात काय घडलं?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (UBT) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं. बुधवारी सायंकाळी खासदार राहुल शेवाळे, यशवंत जाधव, शितल म्हात्रे यांच्यासह शिंदे गटाचे नेते बीएमसीतील शिवसेनेच्या कार्यालयात गेले होते. हे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला.

दोन्ही गट भिडल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद सोडवला. मात्र, यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, मुंबई महापालिका प्रशासनाने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं कार्यालय सील केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT