मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ, BMC कडून नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शहरात मलेरियाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता मुंबई महापालिकेने नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत मुंबईत पावसाळ्यात नेहमी मलेरिया-डेंग्यू या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यामुळे महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०२१ ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत मुंबईत ३ हजार ६०६ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. ऑगस्टमध्ये मुंबईत ८४८ मलेरियाचे रुग्ण सापडले आहेत. जाणून घ्या महापालिकेने दिलेली आकडेवारी-

 • मलेरिया – ३६०६

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 • लेप्टोस्पायरेसिस – १५१

 • डेंग्यू – ३०५

 • ADVERTISEMENT

 • गॅस्ट्रो – १९६४

 • ADVERTISEMENT

 • हेपिटायटीस – १७९

 • H1N1 – ५२

 • (१ जानेवारी ते १२ सप्टेंबर २०२१ ची आकडेवारी)

  नागरिकांसाठी मुंबई महापालिकेने दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे –

  १) आपल्या घरात कोणत्याही प्रकारे डासांचा वावर होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. रिकामे डब्बे, थर्माकॉलचे कॉम्प्लेक्स, नारळ, टायर यात पाणी साठू देऊ नका.

  २) डास चावणार नाहीत म्हणून पूर्णपणे कपडे घालून राहा.

  ३) आजारी व्यक्तींनी स्वतःच्या अंदाजाप्रमाणे गोळ्या घेऊ नयेत. जवळच्या महापालिका रुग्णालयात डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्यावीत.

  ४) उपचार घेण्यात दिरंगाई करु नका असं झालं तर रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

  महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जाऊन तपासणीला सुरुवात केली असून आतापर्यंत तपासलेल्या ४४ हजार घरांपैकी ४ हजार १०८ जागांमध्ये डास निर्माण झाले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे ब्रिडींग स्पॉट नष्ट केले आहेत.

   follow whatsapp

   ADVERTISEMENT