मुंबईकरांनो, नववर्षाची पार्टी विसरा! सेलिब्रेशन करण्यास महापालिकेचा नकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिकेने कोरोना आणि कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटसोबत लढा देण्यासाठी कंबर कसली आहे. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत कायदे आणि नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आता आदेश दिले आहेत की 31 डिसेंबरला मुंबईतील बंदिस्त किंवा मोकळ्या जागेवर नव्या वर्षाशी संबंधित कोणत्याही पार्टी किंवा उत्सवाला संमती दिली जाणार नाही.

ADVERTISEMENT

राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत जमावबंदी असणार आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नवा आदेश दिला आहे. मुंबईत थर्टी फर्स्टची पार्टी बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत कऱण्यासाठी संमती दिली जाणार नाही असं या आदेशात म्हटलंय.

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने? मध्यरात्रीपासून नव्या निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आदेशात?

बृहन्मुंबईच्या महानगरपालिका हद्दीत नवीन वर्षाचा कोणताही कार्यक्रम/कार्यक्रम/मेळावा/पार्टी/कार्यक्रम किंवा कोणत्याही बंदिस्त किंवा मोकळ्या जागेत होण्यास परवानगी दिली जाणार नाही.

ADVERTISEMENT

शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत हा निर्णय अंमलात असेल.

ADVERTISEMENT

हा आदेश न पाळल्यास किंवा आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार शिक्षा देण्यात येईल.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय या अनुषंगाने आम्ही हा आदेश काढला आहे असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्ण संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. कोव्हिड प्रकरणांमध्ये वाढ होऊ नये आणि लोकांना त्याचा पुढे त्रास होऊ नये हे जास्त महत्त्वाचे आहे. नवे वर्ष उत्साहात साजरे करण्यासाठी गर्दी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणं आवश्यक आहे असंही महापालिकेने म्हटलं आहे.

Corona : नाईट कर्फ्यू कसा असणार? काय आहेत नवे निर्बंध? वाचा सविस्तर

मुंबईत शुक्रवारी कोरोना रूग्णांची संख्या एका दिवसात 683 पॉझिटिव्ह रूग्ण इतकी होती. तर मुंबईतल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 46 झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी कोव्हिड टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. त्यामध्ये राज्यातली कोरोनाची स्थिती आणि पुढे निर्माण होणारा धोका, तसंच उपाययोजना या सगळ्यावर चर्चा झाली. गर्दी झाली तर कोरोनाचं संकट गहिरं होऊ शकतं असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने जो नाईट कर्फ्यूचा आदेश काढला आहे त्या व्यतिरिक्त मुंबईत कोणत्याही पार्टीला किंवा गॅदरिंगला परवानगी देता येणार नाही असा नवा आदेश मुंबई महापालिकेने काढला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच हा नियम लागू करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT