आदिपुरूष मधल्या सैफच्या लुकवरून वाद, हिंदू महासभा म्हणते हा तर आतंकी खिलजी!
आदिपुरूष सिनेमातल्या सैफ अली खानच्या लुकवरून चांगलीच चर्चा होते आहे. या लुकवरून वादही निर्माण झाला आहे. सैफ अली खान आदिपुरूष सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात सोशल मीडियावर सैफ अली खानची प्रचंड खिल्ली उडवली जाते आहे. सुरमा लावणारा रावण आम्ही कधीही पाहिला नाही असं नेटकरी म्हणत आहेत. आदिपुरूष या सिनेमाचा टिझर नुकताच रिलिज झाला आहे. […]
ADVERTISEMENT

आदिपुरूष सिनेमातल्या सैफ अली खानच्या लुकवरून चांगलीच चर्चा होते आहे. या लुकवरून वादही निर्माण झाला आहे. सैफ अली खान आदिपुरूष सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात सोशल मीडियावर सैफ अली खानची प्रचंड खिल्ली उडवली जाते आहे. सुरमा लावणारा रावण आम्ही कधीही पाहिला नाही असं नेटकरी म्हणत आहेत. आदिपुरूष या सिनेमाचा टिझर नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमात प्रभास प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सनॉन सीता ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसतो आहे. दुसरीकडे हिंदू महासभेनेही सैफच्या लुकवर आक्षेप घेतला आहे.
सैफच्या रावण लुकवर प्रश्नचिन्ह
आता अखिल भारत हिंदू महासभाचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी सैफ अली खानचा जो लुक दाखवला गेला आहे त्याची निंदा केली आहे. भगवान शंकराचा भक्त लंकाधिपती रावण याच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. सैफ अली खानचं चित्रण दहशतवादी खिलजडी किंवा चंगेज खान, औरंगजेब यासारखा केलं आहे. त्याच्या डोक्यावर टिळा नाही किंवा त्रिपुंडही दिसत नाही. आमच्या पौराणिक चरित्रांसोबत खेळ आम्ही सहन करणार नाही असं चक्रपाणी महाराज यांनी म्हटलं आहे.
भाजप प्रवक्त्या मालविका यांचाही आक्षेप
याशिवाय भाजपच्या प्रवक्त्या मालविका यांनीही आदिपुरुषबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वाल्मिकी रावण, इतिहासातले रावण, लंकाधिपती, महाशिवाचे भक्त जे ६४ कलांमध्ये प्रवीण होता. रावणाच्या सिंहासनावर ९ ग्रह जडवले गेले होते. थायलंडचे लोक किती चांगल्या पद्धतीने रामयणाच्या तालावर नाच करतात. असं सगळं असताना हे कार्टून का तयार केलं? मी हे मानते की हा खरोखरच तैमूरचा पिता आहे. बॉलिवूडचे लोक किती मूर्ख आहेत जे थोडाही रिसर्च करत नाही.