चमचमत्या बॉलिवूडची ड्रग्ज नावाची काळी बाजू आणि NCB ने केलेली कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर NCB अर्थात अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग हा बॉलिवूड आणि ड्रग्ज यांची नेमकी काय लिंक आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. या सगळ्यात चमचमत्या दुनियेची काळी बाजू समोर आली आहे. 3 ऑक्टोबर 2021 ला NCB ने किंग खान शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला अटक केली. एवढंच नाही तर कॉर्डिलिया क्रूझवर होणारी ड्रग्ज पार्टीही उधळून लावली. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

आपण जाणून घेऊ काय काय घडलं?

हे वाचलं का?

सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला. त्याला आता दीड वर्ष होऊन गेलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्ज यांची लिंक असल्याचे आरोप झाले. ज्यानंतर NCB ने बॉलिवूडमधले याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. असं असलं तरीही हे सगळं आत्ताच सुरू झालेलं नाही. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर आत्ता सुरू झालेला नाही. तर तो आधीपासूनच होतो आहे.

1993 ला अभिनेता संजय दत्तला बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली. मात्र तो देखील अंमली पदार्थ सेवनात अडकला होता. संजय दत्त हा सिनेसृष्टीतला पहिला अभिनेता होता जो ड्रग्ज सेवन प्रकरणात अडकला होता. त्यानंतर 1982 मध्ये त्याला पाच महिने तुरुंगात जावं लागलं होतं. संजय दत्तवर जो बायोपिक तयार झाला होता त्यातही ही बाब दाखवण्यात आली होती.

ADVERTISEMENT

या घटनेनंतर नजीकच्या काळात ड्रग्ज आणि बॉलिवूड यांच्यातल्या अनेक घटना कमी-अधिक प्रमाणात समोर आल्या होत्या.

ADVERTISEMENT

मागच्या काही महिन्यांमध्ये NCB ने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग या सगळ्यांचीही चौकशी NCB ने केली.

एवढंच नाही तर काही जणांना तुरुंगातही जावं लागलं होतं

रिया चक्रवर्ती

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सप्टेंबर 2020 मध्ये रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्या प्रकरणी तिचा भाऊ शौविकलाही अटक करण्यात आली. सुशांत सिंग राजपूतसाठी ड्रग्ज अरेंज केल्याचा आरोप या दोघांवर होता. नंतर या दोघांची सुटका जामिनावर करण्यात आली.

प्रीतीका चौहान

टीव्ही स्टार प्रीतीका चौहानलाही ऑक्टोबर 2020 मध्ये सोबत गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही कालावधीनंतर तिलाही जामीन मंजूर करण्यात आला.

भारती सिंग

कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांनाही नोव्हेंबर 2020 मध्ये एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या घरातून आणि ऑफिसमधून काही अंमली पदार्थ आढळून आले होते. या दोघांनाही नंतर सोडण्यात आलं.

शबाना सईद

फिरोझ नाडियादवालाची बायको शबाना सईद हिला नोव्हेंबर 2020 मध्ये NCB ने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला मुंबईतल्या कोर्टाने जामीन मंजूर केला.

कपिल जव्हेरी

ऑगस्ट 2020 मध्ये अभिनेता कपिल जव्हेरीला गोव्यातून अटक कऱण्यात आली. गोव्यामध्ये रेव्ह पार्टी होणार आहे हे पोलिसांना समजलं होतं ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कपिल जव्हेरी हा पार्टी अरेंज करणारा मुख्य होता.

अरमान कोहली

अभिनेता अरमान कोहलीला ऑगस्ट 2021 मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. एनसीबीला त्याच्याकडून 1.2 ग्रॅम कोकेन सापडलं होतं. त्याचा जामीन फेटाळण्यात आला.

फरदीन खान

मे 2021 ला अभिनेता फरदीन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. फरदीन खान कोकेन खरेदी करण्यासाठी गेला होता.

ड्रग्स केस: अभिनेता फरदीन खानकडेही सापडलं होतं ड्रग्स, तेव्हा काय झाली होती शिक्षा?

सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर समोर आलेलं ड्रग्ज प्रकरण आणि चौकशी, अटक झालेले सेलिब्रिटी

सप्टेंबर ऑक्टोबर 2020- 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला तिच्या चौकशीनंतर अटक कऱण्यात आली. तिच्यावर सातत्याने ड्रग्ज प्रकरणात आरोप होत होते. कोर्टाने तिचा जामीनही नाकारला. त्यानंतर रिया चक्रवर्तीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 7 ऑक्टोबर 2020 ला कोर्टाने तिला जामीन मंजूर केला.

23 सप्टेंबर 2020- सिने निर्माता मधू मंतेनाची मुंबईच्या NCB ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणातले काही प्रश्न आणि ड्रग्ज कनेक्शनबाबत विचारण्यात आले होते.

24 सप्टेंबर 2020- सिमोन खंबाटाची NCB ने चौकशी केली. बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणातच ही चौकशी झाली होती.

25 सप्टेंबर 2020- अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली. सुमारे चार तास NCB कार्यालयात तिची चौकशी झाली होती.

25 सप्टेंबर 2020- असिस्टंट डायरेक्टर क्षितिज रविप्रसाद आणि अनुभव चोप्रा या दोघांची चौकशी ड्रग्ज प्रकरणात करण्यात आली.

26 सप्टेंबर 2020 ला बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींचीही सात तास NCB कडून चौकशी करण्यात आली. तसंच सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही यांची चौकशी झाली. दीपिकाला साडेपाच तास, सारा अली खानला साडेचार तास आणि श्रद्धा कपूरला सहा तास प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.

26 सप्टेंबर 2020 ला NCB ने धर्मा प्रॉडक्शनचा कार्यकारी निर्माता क्षितिज रविप्रसादला ड्रग्ज केसमध्ये अटक केली. ही ड्रग्ज केस सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित असल्याचं एनसीबीने म्हटलं होतं.

18 ऑक्टोबर 2020 ला NCB ने अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आगिसिल्स याला अटक केली.

8 नोव्हेंबर 2020- NCB ने प्रसिद्ध सिने निर्माता फिरोज नाडियादवाला याच्या घरी छापा मारला. या ठिकाणी असलेलं साडेतीन लाखांचं ड्रग्ज NCB ने जप्त केलं आणि त्याची पत्नी शबाना सईद हिलाही अटक केली.

12 नोव्हेंबर 2020- साऊथ अफ्रिकन मॉडेल ग्रॅबेलिया हिची एनसीबीने सहा तास ड्रग्ज प्रकरणात चौकशी केली.

21 नोव्हेंबर 2020- ड्रग्ज प्रकरणात NCB ने कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया या दोघांना अटक केली. या दोघांच्या घरी आणि कार्यालयात 86 ग्रॅम गांजा आढळून आला अशी माहिती तेव्हा समोर आली होती.

21 डिसेंबर 2020 – अभिनेता अर्जुन रामपालची सहा तास मुंबईत NCB कडून चौकशी करण्यात आली. बांद्रा या ठिकाणी त्याच्या घरात जे ड्रग्ज आढळलं त्याबद्दल ही चौकशी करण्यात आली.

2 फेब्रुवारी 2021 ला सुशांत सिंग राजपूतचा एकेकाळी मॅनेजर असलेल्या ऋषिकेश पवारला NCB ने अटक केली. ड्रग्ज प्रकरणातच ही अटक करण्यात आली.

डिसेंबर 2020 मध्ये सिने दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या विरोधात नोटीस बजावण्यात आली होती. त्याने एक पार्टी दिली होती त्यामध्ये ड्रग्जचा वापर झाला आहे का हे त्याला विचारण्यात आलं होतं ज्याला उत्तर देत असताना या पार्टीत ड्रग्ज वापर झालेला नाही असं करण जोहरने म्हटलं होतं. करण जोहरला या पार्टीचे डिटेल्स देण्यास सांगितलं होतं. ज्यानंतर त्याने या पार्टीचे डिटेल्स दिले आणि ड्रग्जचा वापर झाला नसल्याचं सांगितलं. मात्र या पार्टीतला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता ज्यामध्ये रणबीर कपूर, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, विकी कौशल, वरूण धवन, शाहिद कपूर, मलायका अरोरा, अयान मुखर्जी, झोया अख्तर हे सगळे दिसत होते. यावरून ही नोटीस करण जोहरला पाठवण्यात आली होती.

29 ऑगस्ट 2021 ला अरमान कोहलीला ड्रग्ज प्रकरणात पुन्हा एकदा अटक करण्यात आली. 1.2 ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. 28 ऑगस्टला या अभिनेत्याच्या घरी छापा मारण्यात आला होता. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अरमान कोहलीला अटक करण्यात आली. याच दिवशी अजय सिंग नावाच्या एका ड्रग पेडलरलाही NCB ने अटक केली. मागच्याच महिन्यात कोर्टाने अरमान कोहलीला जामीन नाकारला आहे.

२५ सप्टेंबर 2021 ला आगिसिल्सला गोवा आणि मुंबईच्या NCB च्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा अटक केली. आगिसिल्स हा अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे.

SRK च्या मुलाला अटक

गेल्या दीड वर्षात ही सगळी कारवाई आपण पाहिलीच आता, 3 ऑक्टोबरला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. कॉर्डिलिया क्रूझ शिपवर होणारी ड्रग्ज पार्टी उधळून टाकण्यात आली आणि त्यानंतर आठ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा ही बडी नावंही आहेत. आर्यनला NDPS Act च्या कलम 8C, 20 B, 27 आणि 35 अन्वये अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT