तुमच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये? वानखेडे प्रकरणी हायकोर्टाचा नवाब मलिकांना सवाल
न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न आज बॉम्बे हायकोर्टाने नवाब मलिक यांना विचारला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा सवाल मलिक यांना विचारला आहे. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा हायकोर्टाचे […]
ADVERTISEMENT
न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये? असा प्रश्न आज बॉम्बे हायकोर्टाने नवाब मलिक यांना विचारला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हा सवाल मलिक यांना विचारला आहे.
ADVERTISEMENT
NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतरही नवाब मलिक आपल्या परिवाराची बदनामी करत असल्याचा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. याआधी झालेल्या सुनावणी नवाब मलिकांच्या वकिलांनी 9 डिसेंबरपर्यंत मलिक वानखेडे परिवाराबद्दल काहीही बोलणार नाहीत असं सांगितलं होतं.
समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट
हे वाचलं का?
गेल्या आठवडाभरात मलिक यांनी तीनवेळा आपल्या परिवाराची बदनामी केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. जस्टीस शाहरुख काठावाला आणि जस्टीस मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर याबाबत झालेल्या सुनावणीदरम्यान नवाब मलिकांना हायकोर्टाने हा प्रश्न विचारला आहे.
न्यायमूर्ती एस.जे. काठावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सुनावणी करताना सांगितले, ‘मलिक यांनी दिलेल्या वचनाचं त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उल्लंघन करण्यात आल्याचे आम्हाला प्रथमदर्शनी दिसतं आहे. आम्ही कोणतीही कारवाई करण्यापूर्वी, आम्ही त्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देतो. विधानाचा जाणूनबुजून उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई का करू नये? असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे.
ADVERTISEMENT
समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी ऑक्टोबर महिन्यापासून पत्रकार परिषदा घेऊन समीर वानखेडे यांच्याबाबत विविध वक्तव्यं केली होती. एवढंच नाही तर समीर वानखेडे आणि ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्टही केल्या आहेत. त्यानंतर या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी या प्रकरणी बदनामीचा दावा दाखल केला. प्रदीर्घ सुनावणीनंतर कोर्टाच्या हे लक्षात आलं आहे की नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई झाल्याने ते त्या द्वेषातून ट्विट करत आहेत. कोर्टाने मलिक यांना हे सगळं रोखण्यास सांगितलं होतं. तरीही गेल्या आठवड्यात नवाब मलिक यांनी काही वक्तव्यं केली आहे त्यामुळे ज्ञानदेव वानखेडेंनी पुन्हा एकदा कोर्टात धाव घेतली.
नवाब मलिक यांनी यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ही वक्तव्यं केल्याचा युक्तिवाद केला. दरम्यान कोर्टाने मलिकांनी कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा निष्कर्ष नोंदवला तसंच आम्ही कारवाईचा आदेश देण्यापूर्वी तुम्हीच कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान कारवाई का करू नये हे सांगावं अशी विचारणा केली. कोर्टाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं असून 10 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
नवाब मलिक यांनी याआधी कोर्टात समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात 9 डिसेंबरपर्यंत कोणतंही वक्तव्य करणार नाही, अशी हमी दिली होती. वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याचे आदेश आम्ही देऊ की तुम्ही त्याबाबतची हमी देणार? अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर मलिक यांनी उपरोक्त हमी दिली होती. मलिक अशाप्रकारे का वागत आहेत, अशी विचारणा करतानाच त्यांनी समाजमाध्यमावरून केलेली वक्तव्यं ही द्वेषातून असल्याचेही न्यायालयाने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT