प्रेयसीला पेटवणाऱ्या प्रियकराचाच मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

मुंबई तक

प्रियकराने आपल्या प्रेयसीला संपविण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार प्रियकराच्याच जीवावर बेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील मेघवाडीमध्ये ही अत्यंत भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीला जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकरालाच आपला जीव गमवावा लागला आहे. तर प्रेयसी देखील 90 टक्क्यांहून अधिक भाजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशी माहिती दिली की, महिलेचा प्रियकर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रियकराने आपल्या प्रेयसीला संपविण्यासाठी तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार प्रियकराच्याच जीवावर बेतला आहे. मुंबईच्या जोगेश्वरीमधील मेघवाडीमध्ये ही अत्यंत भीषण घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसीला जाळण्यासाठी गेलेल्या प्रियकरालाच आपला जीव गमवावा लागला आहे. तर प्रेयसी देखील 90 टक्क्यांहून अधिक भाजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अशी माहिती दिली की, महिलेचा प्रियकर विजय खांबे हा देखील गंभीररित्या भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे विजयच्या प्रेयसीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर आम्ही मृत विजयविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास देखील सुरु करण्यात आला आहे.’

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp