बुलढाणा : काकाकडून अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार

मुंबई तक

बुलढाण्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सख्ख्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. शहरात मोलमजुरीसाठी गेलेल्या पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीची जबाबदारी काकावर सोपवली होती. परंतू काकाने याचा फायदा उचलत आपल्याच पुतणीवर अत्याचार केले. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन बुलढाणा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बुलढाण्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सख्ख्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. शहरात मोलमजुरीसाठी गेलेल्या पीडित मुलीच्या आईने आपल्या मुलीची जबाबदारी काकावर सोपवली होती. परंतू काकाने याचा फायदा उचलत आपल्याच पुतणीवर अत्याचार केले. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी काकाविरुद्ध बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली : आईला जामिन मिळवून देण्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई मुंबईत १५ दिवसांसाठी मजुरीच्या कामासाठी गेली होती. यावेळी तिने आपल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्या काकावर दिली. परंतू आपल्या पुतणीच्या भोळेपणाचा फायदा घेत काकाने तिच्यावर अत्याचार केले.