राणीच्या बागेत आता राजाचं राज्य…

मुंबई तक

मुंबई तक: कोरोना काळात बंद केलेलं भायखळ्याचं वीर जीजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग तब्बल अकरा महिन्यांनंतर सामान्यांसाठी खुलं झालं आहे. तर, यावेळी उद्यानातील प्रमुख आकर्षण ठरणारा शक्ती वाघ स्वतः एक वर्षाच्या क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे. तेव्हा ‘शक्ती’ हा राणीच्या बागेलतला राजा हेच यावेळी भायखळा प्राणिसंग्रहालयातील प्रमुख आकर्षण असणार आहे. राणीची बाग लॉकडाऊननंतर उघडताना तिथलं प्रमुख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई तक: कोरोना काळात बंद केलेलं भायखळ्याचं वीर जीजामाता उद्यान म्हणजेच राणीची बाग तब्बल अकरा महिन्यांनंतर सामान्यांसाठी खुलं झालं आहे. तर, यावेळी उद्यानातील प्रमुख आकर्षण ठरणारा शक्ती वाघ स्वतः एक वर्षाच्या क्वारंटाईनमधून बाहेर आला आहे. तेव्हा ‘शक्ती’ हा राणीच्या बागेलतला राजा हेच यावेळी भायखळा प्राणिसंग्रहालयातील प्रमुख आकर्षण असणार आहे.

राणीची बाग लॉकडाऊननंतर उघडताना तिथलं प्रमुख आकर्षण आहे तो राजबिंडा शक्ती आणि त्याची वाघिण क्रृष्णा. औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहायलातून शक्ती फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईत आला. शक्ती मुंबईत आला त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. आता त्याचं वय साडेचार वर्षे आहे. शक्ती मुंबईत आला आणि काही दिवसांतच लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे शक्ती आणि करीश्मा यांना त्यांच्या चिमुरड्या फॅन्सची भेट घेता आली नाही. मुंबईत आल्यानंतर तब्बल एक वर्षानंतर शक्ती क्वारंटाईनमधून बाहेर येणार आहे.

शक्तीला पाहताना जणू रणथंबोरच्या जंगलात फिरणारे वाघ बघतोय असा फिल घेता येणार आहे. कारण शक्तीसाठी खास तयार केलेला पिंजरा किंवा एनक्लोजर बघणं हे एक आकर्षण असणार आहे. काचेच्या एनक्लोजरमधून पर्यटकांना पाण्यात डुंबणारा शक्ती आणि क्रिष्मा वाघिण यांचा रुबाबदार वावर टिपणं शक्य होणार आहे.

शक्तीबद्दल मुंबईतकने खास माहिती मिळवली आहे ती अशी की जेवताना शक्तीला पाहणं ही बघ्यांसाठी मेजवानी असते. अत्यंत राजेशाही थाटात तो आपलं जेवण करतो. तेव्हा त्यांच्या जेवणाच्या वेळा पाळल्या तर एक मस्त दृश्य पर्यटकांना पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त एखाद्या फुलपाखराच्या किंवा उडणाऱ्या पानाचा पाठलाग करताना शक्तीला पाहिलं तर शिकार करणाऱ्या वाघाला पाहिल्याचा थरार अनुभवता येईल असं इथले लोक सांगतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp