बिहारमधील नितीश सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस ठरला; संभाव्य यादीत तेजस्वी यादव यांचा दबदबा

मुंबई तक

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नितीश-तेजस्वी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची संभाव्य यादीही समोर आली आहे. बिहार सरकारमध्ये एकूण 31 मंत्री असतील. तेजस्वी यांचे भाऊ तेज प्रताप यादव हेही मंत्रिमंडळात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात कोणाचा असणार दबदबा? संभाव्य मंत्रिमंडळाची जी यादी समोर येत आहे. त्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नितीश-तेजस्वी सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची संभाव्य यादीही समोर आली आहे. बिहार सरकारमध्ये एकूण 31 मंत्री असतील. तेजस्वी यांचे भाऊ तेज प्रताप यादव हेही मंत्रिमंडळात असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मंत्रिमंडळात कोणाचा असणार दबदबा?

संभाव्य मंत्रिमंडळाची जी यादी समोर येत आहे. त्यात आरजेडीला अधिक जागा मिळणार असल्याचं कळतंय. मंत्रिमंडळातील वाट्याबाबत बोलायचे झाले तर आरजेडी मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांच्याकडे 15 मंत्रीपद असतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमधून उपेंद्र कुशवाह यांच्या नावासह 11 जणांना मंत्री केले जाऊ शकते. बिहारमधील महाआघाडीच्या नव्या सरकारमध्ये एकूण सात पक्षांचा सहभाग आहे. जेडीयू, आरजेडी, काँग्रेस आणि जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्थान अवाम मोर्चा (एचएएम) यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.

नुकतंच बिहार राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. आत्तापर्यंत भाजप आणि जेडीयूचं सरकार बिहारमध्ये होतं. नितीश कुमार हे मुख्यमंत्री होते. मात्र नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडत आरजेडी, काँग्रेस, एचएएम सह अन्य पक्षांसोबत मिळून भाजपला बाजूला सारत सरकार स्थापन केली आहे. आरजेडीपेक्षा कमी जागा असल्यातरी जेडीयूचे नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता मंगळवारी या सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. ज्यामध्ये अधिक जागा असलेल्या आरजेडी पक्षाला जास्त मंत्रिपद मिळणार आहे, अशी संभावना व्यक्त केली जात आहे.

बिहार राज्यातील मंत्रिमंडळाची संभाव्य यादी

जेडीयू

1. विजेंद्र यादव

2. विजय चौधरी

3. श्रवण कुमार

4. उपेंद्र कुशवाहा

5. अशोक चौधरी

6. मदन साहनी

7. दामोदर रूट

8. संजय झा

9. जामा खान

10. सुमित कुमार सिंह

11. लेसी सिंह

आरजेडी

1. तेज प्रताप यादव

2. सुरेंद्र यादव

3. चंद्रशेखर

4. शशि भूषण सिंह

5. कार्तिक सिंह

6. कुमार सरबजीत

7. भूदेव चौधरी

8. अख्तरुल इस्लाम शाहीन

9. शाहनवाजी

10. समीर महासेठ

11. अनीता देवी

12. आलोक मेहता

13. राहुल तिवारी

14. सुधाकर सिंह

15. अनिल साहनी

काँग्रेस

1. शकील अहमद

2. राजेश कुमार

एचएएम

1. संतोष मांझी

हे वाचलं का?

    follow whatsapp