शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी? या चेहऱ्यांना मिळणार संधी?
एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार २९ जूनला गेलं. उद्धव ठाकरे यांनी त्याचदिवशी राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून सातत्याने या सरकारवर टीकाही केली जाते आहे. […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकार २९ जूनला गेलं. उद्धव ठाकरे यांनी त्याचदिवशी राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून सातत्याने या सरकारवर टीकाही केली जाते आहे. अशात मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होऊ शकतो.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी लाटा मोजत बसलेत का? मंत्रिमंडळ विस्तार का नाही?-शिवसेना
महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार?
मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगितले जाते. पहिल्या टप्प्यात बारा जणांचा शपथविधी होऊ शकतो यात भाजपकडून सात तर शिंदे गटाकडून पाच मंत्र्यांचा शपथ दिली होईल.
भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखऱ बावनकुळे ही नावं चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे गटातील आमदारांना ८ कॅबिनेट मंत्रिपदं तर ५ राज्यमंत्रिपदं मिळू सकतात. भाजपच्या वाट्याला २९ मंत्रिपदं येऊ शकतात.