वाझेंसाठी मध्यरात्री डॉक्टरला पाचारण, NIA ऑफिसमध्ये काय घडतंय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अँटेलिया संशयित कार प्रकरणी अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासाठी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास डॉक्टरांना एनआयए कार्यालयात पाचारण करण्यात आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, याबाबत एनआयएकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. (calling a doctor at midnight for sachin vaze whats going on in the nia office)

ADVERTISEMENT

दरम्यान, शनिवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी एनआयएने सचिन वाझे यांना मुकेश अंबानींच्या अँटेलियाबाहेर कारमध्ये स्फोटक ठेवल्याच्या संशयातून अटक केली. त्याआधी तब्बल 13 तास त्यांची एनआयएकडून चौकशी सुरु होती.

वाझेंना अटक केल्यानंतर काल (रविवार) त्यांना विशेष कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टाने त्यांना 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे आता पुढील काही दिवस एनआयएचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणी वाझेंची कसून चौकशी करणार आहेत.

हे वाचलं का?

सचिन वाझेंना झालेली अटक बेकायदेशीर !

या सगळ्या घडामोडी सुरु असताना काल रात्री मात्र, एनआयएच्या कार्यालयात डॉक्टरांना बोलावण्यात आलं. यावेळी वाझेंची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी वाझेंची तपासणी केली आणि काही वेळाने निघून गेले. मात्र, याविषयी डॉक्टर किंवा एनआयए यापैकी कुणीही माहिती दिली नाही.

ADVERTISEMENT

शनिवारी सचिन वाझे यांना अटक करण्यापूर्वी NIA च्या अधिकाऱ्यांनी १३ तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर थकवा जाणवत असल्याने रविवारी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे तात्पुरते उपचार केल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

मोठी बातमी: २५ मार्चपर्यंत सचिन वाझे NIA च्या कस्टडीत

नेमकं प्रकरण काय जाणून घ्या थोडक्यात:

२५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या मुंबईतील निवासस्थानाच्या बाहेर स्कॉर्पिओ कार आणि त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्यांसह एक धमकीचं पत्र सापडलं होतं. ज्याचा तपास सुरुवातीला क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे यांच्याकडेच होता.

अखेर हा संपूर्ण तपास एनआयएने आपल्या ताब्यात घेतला. या सगळ्या प्रकरात सगळ्यात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रकरणाचा तपास अधिकारीच आता आरोपी ठरला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.

कोणत्या कलमांखाली वाझेंना अटक करण्यात आली आहे?

सचिन वाझे यांना 286, 465, 473, 560 (2), 120 बी अंतर्गत आयपीसी आणि 4(A) (B) (I) स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अँटेलिया येथील स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यात सचिन वाझे यांची भूमिका आणि सहभाग असल्याचा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT