ठरलं! महाराष्ट्रात या तारखांना होणार दहावी आणि बारावीच्या परीक्षा!

Abhinn Kumar

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर 2021 पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीसाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

या वेळापत्रकानुसार इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा आणि आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

हे वाचलं का?

CBSE Date Sheet 2022 : सीबीएसई दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी तोंडी-अंतर्गत गुणांच्या परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 5 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता दहावीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा 5 एप्रिल ते 19 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. इयत्ता दहावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जुलै 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.

ADVERTISEMENT

परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT