केंद्र महावितरणचं खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ऊर्जा राज्यमंत्र्यांचं खळबळजनक विधान

मुंबई तक

राज्यात वीज तुटवड्याचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतानाच आता नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या विचारात असून, तशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. अहमदनगरमध्ये ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यावर कोळशाच्या तुटल्यामुळे लोडशेडिंगचं संकट येत असताना केंद्र सरकार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यात वीज तुटवड्याचा प्रश्न चव्हाट्यावर आलेला असतानाच आता नागरिकांची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार महावितरणचं खाजगीकरण करण्याच्या विचारात असून, तशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

अहमदनगरमध्ये ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यावर कोळशाच्या तुटल्यामुळे लोडशेडिंगचं संकट येत असताना केंद्र सरकार महाविरतणचे खाजगीकरण करण्याची तयारी करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे, असं ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं.

याविषयी अधिक माहिती देताना तनपुरे म्हणाले, ‘महावितरणचे खाजगीकरण होऊ शकते अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मला भिती वाटतेय, कारण जर असं झालं आणि एखादा खाजगी वीज वितरण करायला बसला, तर तो शेतकऱ्यांकडे दुष्काळ आहे; ओला दुष्काळ पडलाय हे जर न बघता सरसकट जुल्मी वसुली त्याने केली तर मोठे अवघड दिवस शेतकऱ्यांवर येतील’, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप; राज्य सरकारमुळे महाराष्ट्रात लोडशेडिंग

हे वाचलं का?

    follow whatsapp