आगामी लोकसभेसाठी अनुराग ठाकूर अन् श्रीकांत शिंदेंमध्ये दावे-प्रतिदावे : सामना रंगणार?
कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. राज्यातील निवडक १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (दोन्ही गट) आणि दोन्ही पक्षांचे मतदारसंघ लक्ष करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर सध्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे […]
ADVERTISEMENT
कल्याण : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात भाजपने मायक्रो प्लॅनिंग केलं आहे. राज्यातील निवडक १६ मतदार संघात थेट केंद्रातून नेते पाठवण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (दोन्ही गट) आणि दोन्ही पक्षांचे मतदारसंघ लक्ष करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर सध्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत.
ADVERTISEMENT
मित्र पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंंघात भाजपने ताकद वाढविण्यास सुरुवात केल्याने आगामी लोकसभा निवडणुकासाठी इथून भाजपचा उमेदवार असणार का? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आज या दोन्ही नेत्यांना थेट प्रश्नही विचारण्यात आले. मात्र माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दोघांनीही उत्तर दिले. मात्र अप्रत्यक्षपणे दोघांनीही आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दावे-प्रतिदावे मात्र केले आहेत.
अनुराग ठाकूर काय म्हणाले,
सकाळी अनुराग ठाकूर यांचे कल्याण-डोंबिवली मतदारसंघात स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला स्वतः श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, पुढील तीन दिवस मी इथे आहे, या दरम्यान युवक, युवती, व्यापार विभाग अशा सर्व विभागाच्या सातत्याने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. यातून जमिनीवर मजबूत असेलेला पक्ष आणखी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
हे वाचलं का?
या सगळ्यासाठी तुमचे सहकार्य मला मिळेल, असा मला विश्वास आहे. देशभरात एकूण १४४ मतदारसंघामध्ये आमचा प्रवास सुरु आहे, यात आम्ही मंत्री असू किंवा पक्षाचे बडे नेते असतील, सर्वांवर जबाबदारी आहे. यात एका मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे केवळ आताच नाही, तर पुढील २ वर्ष सातत्याने येणं-जाणं होणार आहे आणि पक्षाला आणखी मजबूत करणार आहे, असेही ठाकूर यांनी सांगितले.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
भाजपाने हा दौरा सहा महिन्यांपूर्वी आयोजित केला होता. त्यानुसार केंद्रीय मंत्र्यांचे कार्यक्रम लावले गेले आहेत. प्रत्येक पक्षाला आपली संघटना मजबूत करायचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपाचा दावा असे वक्तव्य काही भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र हा शिवसेनेचा मतदार संघ असून येथील खासदार मी असून 2024 मध्ये देखील श्रीकांत शिंदेच युतीचे उमेदवार असतील.
ADVERTISEMENT
त्यामुळे आता ठाकूर आणि शिंदे यांच्या या दाव्यानंतर २०२४ साठी कल्याण डोंबिवलीमधून नेमका कोण उमेदवार असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच भाजप पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असल्याने भाजप आणि शिंदे गटामध्येच सामना रंगणार का? आणि तो छुपा सामना रंगणार की उघड हे येणारा काळच ठरविणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT