Narayan Rane यांची ठाकरेंच्या आमदाराला धमकी? ‘त्या’ वक्तव्यानंतर वाढला वाद
Narayan Rane | Nitin Deshmukh news : अकोला : शिवसेना (UBT) ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाने दोन वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून ही धमकी आली, अशी माहिती खुद्द आमदार देशमुख यांनी दिली. यावेळी समोरील […]
ADVERTISEMENT
Narayan Rane | Nitin Deshmukh news :
ADVERTISEMENT
अकोला : शिवसेना (UBT) ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सकाळी ११.३० ते १२ च्या दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावाने दोन वेगवेगळ्या फोन नंबर्सवरून ही धमकी आली, अशी माहिती खुद्द आमदार देशमुख यांनी दिली. यावेळी समोरील व्यक्तीला आपण नरिमन पॉईंटला भेटायला येत असल्याचं प्रतिआव्हान दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली. (central minister Narayan Rane Threat to Thackeray’s MLA nitin deshmukh)
दरम्यान, आपण अतिरिक्त पोलीस संरक्षण घेणार नसल्याचं नितीन देशमुख यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना स्पष्ट केलं. जिल्हा पोलीस अधिक्षकांना धमकीच्या फोनची कल्पना दिली आहे. पण अतिरिक्त पोलीस संरक्षण घेणार नसल्याचं ते म्हणाले. चार दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेला नितीन देशमुख यांनी उत्तर दिलं होतं. यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता.
हे वाचलं का?
Shinde सरकारचा जाहिरातीवर कोट्यावधींचा खर्च; दिवसाला लागतात ‘इतके’ लाख!
काय होता वाद?
म्हाडा वसाहतीतील कार्यालयावरुन नितेश राणेंनी शिवसेना (UBT) आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली होती. तसंच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्यात हिंमत नाही. उद्धव ठाकरे ना*** आहेत, असं नितेश राणेंनी म्हटलं होतं. यावर आमदार देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
ADVERTISEMENT
PM मोदींची इच्छा २ आठवड्यांत पूर्ण! BMC हजारो कोटींच्या ठेवी मोडणार
ADVERTISEMENT
नारायण राणे आणि नितेश राणेंचा चेहरा पाहिला तर ते महाराष्ट्रायीन सोडा हिंदुस्थानीही वाटत नाही. वारंवार चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. नितेश राणे स्वत:लाच साहेब म्हणतात. आधी काँग्रेसमध्ये तळवे चाटून महसुलमंत्रीपद मिळवलं. आता तळवे चाटल्याने केंद्रात मंत्री केलं,” अशी टीका नितीन देशमुखांनी केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंच्या नावाने धमकी आल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT