चंदीगढ महापालिकेत ‘आप’ची जोरदार मुसंडी! भाजपला धक्का, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना आज चंदीगड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालाने भाजप, काँग्रेस शिरोमणी अकालीला दलाला जोरदार धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या अकाली दलाला एकही जागा जिंकता आली नाही, तर पहिल्यांदाच या महापालिका निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. चंदीगढ महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. […]
ADVERTISEMENT
पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना आज चंदीगड महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालाने भाजप, काँग्रेस शिरोमणी अकालीला दलाला जोरदार धक्का दिला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या अकाली दलाला एकही जागा जिंकता आली नाही, तर पहिल्यांदाच या महापालिका निवडणुकीत उतरलेल्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.
ADVERTISEMENT
चंदीगढ महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. 35 जागांसाठी निवडणूक झाली. चंदीगढ महापालिका निवडणुकीत आपने पहिल्यांदाच उडी घेतली होती. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप वेगवेगळे लढले. काँग्रेसच्या कामगिरीकडेही सगळ्यांचं लक्ष होतं.
मतमोजणी सुरू झाल्यापासून आपने आघाडी घेण्यास सुरुवात केली. महापालिका निवडणुकीत आपने भाजप-काँग्रेसला टक्कर देत मोठी मुसंडी मारली आहे. पहिल्याच प्रयत्ना आपने 35 पैकी तब्बल 14 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 12 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसचे 8 उमेदवार विजयी झाले असून, अकाली दलाला 1 जागेवर विजय मिळाला आहे.
हे वाचलं का?
मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर
मतांच्या टक्केवारीकडे लक्ष दिल्यास सर्वाधिक मतं काँग्रेसला मिळाली आहेत. काँग्रेसला 29.98 टक्के मतं मिळाली आहेत. तर भाजपला 28.96 टक्के मतं मिळाली आहेत. 14 जागा जिंकणाऱ्या आपला 27.26 मतं मिळाली आहेत. 2016 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यात दुप्पट झाल्या आहेत. 2016 मध्ये महापालिकेत 26 नगरसेवकच होते.
ADVERTISEMENT
पंजाबमध्ये बदल करण्यासाठी तयार -अरविंद केजरीवाल
ADVERTISEMENT
चंदीगड महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत पक्ष कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे. ‘चंदीगढ महापालिकेत आम आदमी पक्षाचा हा विजय पंजाबमध्ये आगामी काळात होणाऱ्या बदलांचे संकेत आहेत. चंदीगढच्या लोकांनी आज भ्रष्ट राजकारणाला नाकारत ‘आप’च्या प्रामाणिक राजकारणाची निवड केली आहे. आपच्या सर्व विजयी उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन. यावेळी बदलासाठी पंजाब तयार आहे’, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
चंडीगढ़ नगर निगम में आम आदमी पार्टी की ये जीत पंजाब में आने वाले बदलाव का संकेत है।चंडीगढ़ के लोगों ने आज भ्रष्ट राजनीति को नकारते हुए AAP की ईमानदार राजनीति को चुना है।
AAP के सभी विजयी उम्मीदवारों एवं सभी कार्यकर्ताओं को बहुत-बहुत बधाई।
इस बार पंजाब बदलाव के लिए तैयार है।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 27, 2021
2016 मध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी 26 पैकी 20 जागा भाजप-अकाली दलाच्या युतीला मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 4 मिळाल्या होत्या. एक जागा अकाली, तर एक अपक्ष उमेदवार जिंकला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT