“उद्धवजींना आमदार सोडून गेलेत, उद्योजक का जाणार नाहीत?”; भाजपचं वर्मावर बोट
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. झालेल्या बंडखोरीवरून शिंदे गट आणि भाजपकडून सातत्यानं ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलंय. ‘उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणंघेणं नव्हतं. ते बोलत नाहीत […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं. झालेल्या बंडखोरीवरून शिंदे गट आणि भाजपकडून सातत्यानं ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलंय.
‘उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा सर्व काळ हा शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी देणंघेणं नव्हतं. ते बोलत नाहीत म्हणून त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले, तर त्यांच्या काळात उद्योजक महाराष्ट्राबाहेर का जाणार नाहीत?’, असा चिमटा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना काढला.
चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला. बावनकुळे म्हणाले, ‘राज्यात गुंतवणूक व्हायची असेल, तर उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री अठरा महिने मंत्रालयात फिरकले नाहीत. वरिष्ठ सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पहावी लागे.’
‘मिशन बारामती’ भाजपच्या अजेंड्यावर : आणखी एका केंद्रीय मंत्र्यांचा दौरा संपन्न