Chandrakant Khaire: शिंदे गटातील १५ आमदार फोन करुन म्हणतात, “साहेब आमचं चुकलं… आम्हाला माफ करा”

मुंबई तक

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील तब्बल १५ ते १६ आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण उगाचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडले. बाळासाहेबांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील तब्बल १५ ते १६ आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा मोठा गौप्यस्फोट शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे म्हणाले, शिंदे गटातील पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात आहेत. त्यांना असे वाटत आहे की, आपण उगाचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडले. बाळासाहेबांनी आपल्याला मोठे केले आणि त्यांच्या माघारी आपण उद्धव साहेबांना सोडले.

चंद्रकांत खैरे यांनी काय म्हटलं आहे?

शिंदे गटातील आमदार सध्या अस्वस्थ आहेत. ते आता आम्हाला फोन करतात आणि आम्हाला म्हणतात की, साहेब आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरल्यास हे सरकार पडणार आहे. त्यांना हेही माहित आहे की आपण फक्त ५० जण आहोत आणि भाजपवाले ११६ आहेत. ते कोणत्याही पक्षाचे आमदार फोडतील आणि त्यांचा कोटा पूर्ण करतील. परत आपलं काय होणार? त्यामुळे ते आमच्या संपर्कात आले आहेत, असाही दावा खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ईडी, सीबीआय आणि आमिष देऊन सरकारं पाडणं हेच सूत्र; मोदी सरकारबद्दल शरद पवार काय म्हणाले?

नाराजी नाट्यावरही प्रतिक्रिया :

औरंगाबादमधील संजय शिरसाट यांच्या बहुचर्चित नाराजी नाट्यावरही खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढली आहे. गेलेल्या सर्व 50 आमदारांना तर आता मंत्रिपद मिळणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. तसेच पोलीस आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसारच माझा सत्कार आधी केला असेही खैरे म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp