अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेबाबत चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चेबाबत चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मोठ्या नेत्यांची भेट होत असते, विरोधक म्हणून आम्ही विरोध करत असतो. पण अशा भेटी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. भेटी आणि बोलणी करणं यात काही गैर नाही. राजकारणाशिवायही भेटलं पाहिजे, मात्र महाराष्ट्रात अलीकडच्या दीड वर्षात ते कमी झालं आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अमित शाह आणि शरद पवार यांची भेट राजकीय असेलच असे काही नाही. राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितलं जातं आहे की भेट झालीच नाही.. त्यांच्याकडे हे सांगण्याची स्पर्धाच लागली आहे. यातून ते भेट झाली आहे हेच दर्शवत आहेत.. भेट झाली पण त्यात काय चर्चा झाली ते माहित नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

अमित शाह-शरद पवार भेटीबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

भविष्यात राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय झाला तर काय भूमिका असेल? असं विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की मी एक सच्चा स्वयंसेवक आणि कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल. पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतात तो पक्षाच्या हिताचाच असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जो काही निर्णय घेतील तो मान्य असेलच यात काही शंका नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. हे सरकार पडेल किंवा राहिल का? असे संकेत तुमच्यापर्यंत आले आहेत असं विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की असे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, अमित शाह यांना भेटण्याची वेळ ही रात्री उशिराचीच असते कारण ती वेळ निवांत असते असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चिन्हं आहेत का?

शरद पवार यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आता त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील म्हणाले की त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशीच मी तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो.

ADVERTISEMENT

लॉकडाऊनवरही भाष्य

ADVERTISEMENT

कोरोना रूग्ण वाढत आहेत. ती संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा काही उपाय नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने आता लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर हातावर पोट असलेल्या एक कोटी लोकांना प्रत्येकी पाच हजार रूपये द्यावेत अशीही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT