फक्त ‘या’ कारणामुळे महिलेने सोडला स्वत:चा देश अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मॅडालीना इओना फिलिप ही महिला पूर्वी इटलीमध्ये राहत होती, परंतु आता कर वाचवण्यासाठी ती वेगळ्या देशात राहण्यासाठी गेली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पैसे वाचवण्यासाठी ती आता स्वित्झर्लंडमध्ये राहायला गेली आहे. मॅडालीना ही तिचे फोटो शेअर करून पैसे कमवते.

ADVERTISEMENT

ती फक्त फोटोंमधून इतकी कमाई करते की, तिच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. इंस्टाग्रामवर मॅडालीनाचे 1.2 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

ADVERTISEMENT

27 वर्षीय मॅडालीना म्हणते की, इटली तिच्या कमाईवर 28 टक्के कर लावत असे, त्यामुळे तिला देश सोडावा लागला.

आता ती शेजारच्या स्वित्झर्लंडमध्ये राहते, जिथे तिला फक्त 1 टक्के कर आकारला जातो. आता तिने लॅम्बोर्गिनी कार खरेदी केली आहे.

रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ऑगस्ट 2022 मध्ये मॅडालीनाने 1.36 कोटी रुपये कमावले होते. त्यांना इतके फॉलोअर्स कसे मिळाले हेही तिने सांगितले आहे.

सुरुवातीला मॅडालीनाचे फक्त 80 फॉलोअर्स होते. त्यावेळी बहिणीने तिला बीचवर टिकटॉक व्हिडिओ बनवण्यास सांगितलं.

यानंतर तिचे फॉलोवर्स झपाट्याने वाढत गेले. आज लाखो लोक तिला फॉलो करतात. तिच्या पोस्ट आणि व्हिडीओमुळे ती खूपच प्रसिद्ध झाली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये आल्यानंतर तिच्या कमाईवरील कर हा 27.9 टक्क्यांवरून 0.77 टक्के झाला आहे. ज्यामुळे तिला अधिक पैसे मिळू लागले आहेत.

अशाच वेब स्टोरीसाठी क्लिक करा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT