छगन भुजबळांनीच सांगितलं बाळासाहेब ठाकरे त्यांना ‘लखोबा लोखंडे’ का म्हणायचे?

मुंबई तक

छगन भुजबळ यांची पंचहात्तरी नुकतीच झाली. त्याच औचित्याने छगन भुजबळ यांनी मुंबई तकशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे पहिले महापौर ही छगन भुजबळांची ओळख. तसंच त्यांची आणखी एक ओळख ती म्हणजे शिवसेनेतले पहिले बंडखोर. छगन भुजबळ यांच्या मागे ही ओळखही आहे. त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे लखोबा लोखंडे म्हणत. त्यामागचं कारण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

छगन भुजबळ यांची पंचहात्तरी नुकतीच झाली. त्याच औचित्याने छगन भुजबळ यांनी मुंबई तकशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेचे पहिले महापौर ही छगन भुजबळांची ओळख. तसंच त्यांची आणखी एक ओळख ती म्हणजे शिवसेनेतले पहिले बंडखोर. छगन भुजबळ यांच्या मागे ही ओळखही आहे. त्यावेळी त्यांना बाळासाहेब ठाकरे लखोबा लोखंडे म्हणत. त्यामागचं कारण काय होतं? हे छगन भुजबळ यांनीच आज मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं.

शिवसेनेतले पहिले बंडखोर छगन भुजबळ

सध्या शिवसेना हा पक्ष चर्चेत आहे. कारण शिवसेनेचे दोन तुकडे पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड हे शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड आहे. ४० आमदारांची साथ एकनाथ शिंदेंना लाभली आहे. तर अपक्ष १० आमदारही त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यांच्या या बंडामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेत बंड होण्याची ही पहिली वेळ नाही. शिवसेनेतले पहिले बंडखोर छगन भुजबळ. त्यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांच्यावर तुफान टीका झाली होती. बाळासाहेब आपल्या भाषणात छगन भुजबळांचा उल्लेख अनेकदा लखोबा लोखंडे असा करायचे.

नागपूरच्या अधिवेशनात काय झालं?

नागपूरला अधिवेशन होतं. त्यावेळी बातमी फुटली. लोकसत्ता या की कुठल्या तरी वर्तमान पत्रात बातमी आली की छगन भुजबळ फुटणार. त्यावेळी प्रमोद नवलकर माझ्याकडे आले. मला म्हणाले बाळासाहेबांशी बोलून घ्या. मी त्यांना विचारलं कशासाठी? तर ते म्हणाले चला. मला वानखेडे साहेबांच्या मुलीच्या बंगल्यावर नेलं. तिथून प्रमोद नवलकरांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन केला.

हे वाचलं का?