छगन भुजबळ यांनी घेतली Devendra Fadnavis यांची भेट, ‘हे’ आहे कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही सकारात्मक चर्चा झाली. माजी खासदार समीर भुजबळही यावेळी छगन भुजबळ यांच्यासोबत होते.

ADVERTISEMENT

आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन, तुम्ही त्याचं नेतृत्व करा असं आश्वासन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळांना दिलं आहे. छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी सकाळी भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी दोघांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली.

छगन भुजबळ ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांनी मला इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझं मत जाणून घेतलं. यावेळी मी त्यांना मराठा आऱक्षणावेळी कसा इम्पेरिकल डेटा गोळा केला आणि तो सुप्रीम कोर्टाने कसा वैध ठरवला याची माहिती दिली”. तसंच त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात आमच्याकडून पूर्ण मदत केला जाईल असं आश्वासनही दिल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

हे वाचलं का?

‘नियम बदलताना अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियम समितीच्या संदर्भातील बैठक पार पडणं गरजेचं आहे. अन्यथा ती बैठक वैध ठरत नाही. पण त्याहीपलीकडे जर तुमच्याकडे बहुमत असताना का घाबरत आहात? याचा अर्थ तीन पक्षात सर्व काही आलबेल नसून एकमेकांवर, आमदारांवर विश्वास नाही म्हणून हात वरुन मतदान करण्याचा विषय आला आहे’ अशी टीका त्यांनी केली.

ADVERTISEMENT

ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा…

ADVERTISEMENT

‘नाना पटोले एक बोलतात मग त्यावर शरद पवार मत व्यक्त करतात. मग काँग्रेसचे लोक नाना पटोलेंना न घेता शरद पवारांची भेट घेतात यावरुन काय चाललंय समजू शकतो’ असा टोला यावेळी त्यांनी लगावला. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत असून हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल असा दावा यावेळी त्यांनी केला. ज्यादिवशी सरकार कोसळेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT