‘सरकारला समजत नसेल, तर…’, संभाजीराजेंचा चढला पारा, मोदी-शिंदेंना निर्वाणीचा इशारा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात उमटत आहेत. संभाजीराजे छत्रपतींसह उदयनराजे भोसलेंनी भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केलीये. मात्र, सरकारकडून याबद्दल मौन बाळगल्यानं संभाजीराजेंचा पारा चढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान केलं […]
ADVERTISEMENT
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांचे पडसाद अजूनही महाराष्ट्रात उमटत आहेत. संभाजीराजे छत्रपतींसह उदयनराजे भोसलेंनी भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केलीये. मात्र, सरकारकडून याबद्दल मौन बाळगल्यानं संभाजीराजेंचा पारा चढला.
ADVERTISEMENT
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, असं विधान केलं होतं. या विधानाला आक्षेप घेत संभाजीराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह राजकीय पक्षांनी तीव्र निषेध केला. तसेच भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणीही केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यासंदर्भात पत्र लिहिलं होतं. छत्रपती संभाजीराजेंनी आज एक ट्विट करत मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय.
हे वाचलं का?
संजय राऊतांचा संताप! नुपूर शर्मांचा उल्लेख, संभाजी भिडे, शिंदे-फडणवीसांसह विरोध पक्षांनाही सुनावलं
छत्रपती संभाजीराजेंनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दल काय म्हटलंय?
छत्रपती संभाजीराजेंनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे भोसले म्हणतात, ‘भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी मोदी सरकारला दिलाय.
ADVERTISEMENT
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीराजेंनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मूंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं?
भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी मागणी करताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले होते की, ‘महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्यानं महाराष्ट्र राज्य व महापुरुषांबाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधानं करत आहेत. राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे.’
‘केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत तसेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा, इथले अर्थकारण, मराठी अस्मिता या बाबतीत सातत्यानं बेताल भाष्य करून ते केवळ राज्यातील जनतेच्या भावनांचा अपमान करीत नसून, त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे राज्यपाल या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे.’
‘करिता, राज्यातल जनतेच्या भावनेचा विचार करून भगतसिंह कोश्यारी यांना तात्काळ महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे’, असं पत्र छत्रपती संभाजीराजेंनी पंतप्रधान व राष्ट्रपतींना दिलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT