शिवजयंती विशेष : …तर कदाचित महाराजांची भवानी तलवार आज महाराष्ट्रात असती
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला, महाराजांविषयीच्या किस्से आणि कहाण्यांना उजाळा दिला जात आहे. यात एक किस्सा नेहमी ऐकायला मिळतो, तो भवानी तलवारीचा! ब्रिटनमध्ये असलेली ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची ब्रिटनच्या महाराणीशी बैठक ठरली होती. मात्र, ती बैठक झालीच नाही. […]
ADVERTISEMENT

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने महाराजांच्या कार्य कर्तृत्वाला, महाराजांविषयीच्या किस्से आणि कहाण्यांना उजाळा दिला जात आहे. यात एक किस्सा नेहमी ऐकायला मिळतो, तो भवानी तलवारीचा! ब्रिटनमध्ये असलेली ही तलवार आणण्यासाठी महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले होते. त्यांची ब्रिटनच्या महाराणीशी बैठक ठरली होती. मात्र, ती बैठक झालीच नाही. भवानी तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करणारे हे मुख्यमंत्री होते ए.आर. अंतुले!

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दलाचं सरकार बरखास्त करण्यात आलं आणि महाराष्ट्राला पहिले मुस्लीम मुख्यमंत्री मिळाले. त्यांचं नाव होतं ए.आर. अंतुले. अंतुले यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली, त्यांच्या शिवप्रेमाचे किस्से आजही चर्चिले जातात. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सामान्यपर्यंत पोहोचावं म्हणून काही महत्त्वाचं काम केलं. कुलाबाच्या नामांतरापासून ते शिवाजी महाराजांची इंग्लडमध्ये असलेली भवानी तलवार परत आणण्यासाठी धडपड केली.










