उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधातल्या याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी करणारी जनहित याचिकेवर सुनावणीस बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्याय. अभय अहुजा यांच्या खंडपीठाने ही जनहित याचिका ऐकण्यास नकार दिला आहे. तसंच प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करा असंही सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची आणि त्याची चौकशी करण्यात यावी अशी य़ाचिका गौरी भिडे यांनी दाखल केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचं उत्पन्न तसंच त्यांची संपत्ती यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी केली जावी ही मुख्य मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसंच याचिकेत हा आरोप करण्यात आला आहे की उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे असंही गौरी भिडे यांनी म्हटलं होतं.

या याचिकेत आणखी काय म्हटलं गेलं आहे?

ठाकरे कुटुंबाने कशाप्रकारे भ्रष्टाचार केला? कशा पद्धतीने बेहिशेबी मालमत्ता जमा केली? हे सांगणारी कागदपत्रे याचिकेसह जोडण्यात आली होती. कोणत्याही राजकीय पक्षात स्वत: अधिकृत पद धारण करणं हे उत्पन्नाचे कायदेशीर साधन असू शकत नाही. त्याचप्रमाणे, कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपदाची घटनात्मक पदे धारण करणे हे देखील उत्पन्नाचे साधन नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कधीही कोणत्याही विशिष्ट सेवा, व्यवसाय आणि व्यवसाय त्यांच्या उत्पन्नाचे अधिकृत स्त्रोत उघड केले नाहीत. तरीही त्यांच्याकडे मुंबईसारख्या शहरात आणि रायगड जिल्ह्यात प्रचंड मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला होता. मात्र ही याचिका ऐकण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या गौरी भिडे कोण आहेत?

सामना दैनिक आणि मार्मिक हे साप्ताहिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचा प्रबोधन प्रकाशनचा छापखाना जिथे आहे त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा राजमुद्रा प्रकाशन हा छापखाना होता. सामना आणि मार्मिक यांच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री २ सारखी उंच इमारत उभी राहणं, आलिशान गाड्या, फार्म हाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आमचाही व्यवसाय तोच असल्याने आमच्या आणि त्यांच्या मिळकतीत जमीन आस्मानाचा फरक कसा असाही प्रश्न याचिकेत विचारण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT