“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…” : CM शिंदेंचा टोमणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar vs Eknath Shinde :

ADVERTISEMENT

मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे शुक्रवारी सभागृहात दमदार भाषण झालं. यात विरोधकांना टोले होते, विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टोमणे होते आणि सभागृहासाठी मनमुराद हशा होता. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सरकारवर आणि मुख्यमंत्री शिंदेवर केलेल्या टीकांना आजच्या भाषणातून शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसंच सरकारने केलेल्या कामाचा आढावाही सभागृहापुढे ठेवला. (Chief Minister Eknath Shinde gave a powerful speech in the assembly on Friday)

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

“अजितदादांनी सहशिवसेनाप्रमुख होण्याची संधी गमावली…”

अजितदादा शिवसेनेची इतकी बाजू मांडायला लागले आहेत की, त्यांना आता एखादं पदं द्यायचं बाकी आहे, असं शिंदे यांनी यांनी म्हणताच शेजारी बसलेल्या फडणवीस यांनी शिंदेंच्या वाक्याला दुजोरा देत “सहशिवसेनाप्रमुख…” असं सुचवलं. यावर परत शिंदे म्हणाले, पण आता तेही पद देऊ शकत नाही. कारण शिवसेना तर आमच्याकडे आहे. दादा आता तीही संधी गमावली. शिंदे यांच्या टोल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.

हे वाचलं का?

Nagaland मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने चमत्कार कसा केला? वाचा Inside Story

प्रकल्प कुठे थांबले हे तुम्हाला माहित होतं :

सत्तेतून अचानक पायउतार झाल्यानंतर अजितदादांच्या डोळ्यावर जी काही अंधारी आली आहे . त्यामुळे आम्ही केलेलं काम तुम्हाला दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही. पुण्यामध्ये अर्धातास आधी पोहचू. लोणावळा लेकच्या खाली १०० मिटरचा सर्वात मोठा बोगदा करतोय. हे प्रकल्प कुठे थांबले होते हे तुम्हाला माहिती होते.

ADVERTISEMENT

तर तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का?

यावेळी शिंदे यांनी अजितदादांना टोला लगावताना म्हटलं की, तुम्ही सतत म्हणता, घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य मुख्यमंत्री, अजितदादा मी जर घटनाबाह्य मुख्यमंत्री आहे तर तुम्ही काय घटनाबाह्य विरोधीपक्ष नेते आहात का? शिंदे यांच्या या सवालावरही सभागृहात जोरदार हशा पिकला.

ADVERTISEMENT

PM Narendra Modi यांची जादू ओसरली? ३ राज्यातील निकाल भाजपसाठी का चिंताजनक?

“सकाळच्या शपथविधीच्या सुरस कथा हळूहळू बाहेर येत आहेत”

यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, अजित पवारांनी सकाळी साखर झोपेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा मला फोन आला होता. मी टीव्ही सुरू केला. बघितलं तर अजित पवार शपथ घेताना दिसले. मी जयंत पाटलांना फोन केला, पण त्यांनी उचलला नाही. जयंत पाटीलही तिथंच असल्याचं मला सांगण्यात आलं. तो माझ्यासाठी मोठा धक्का होता. आता मी त्यात फार जात नाही, पण याबाबतच्या अनेक सुरसकथा हळूहळू बाहेर येत आहेत. दोन-चार सुरसकथा देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितल्या. त्यांनीही सगळ्या सांगितल्या नाहीत.”

कामांचाही घेतला आढावा :

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या कामांबद्दलही सभागृहाला माहिती दिली. ते म्हणाले, सरकारने जेष्ठांसाठी एसटी मोफत केली. यातून आतापर्यंत ५ कोटी ६५ लाख लोकांनी फायदा घेतला आहे. १६० ठिकाणी हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला. मेट्रो ४ आणि ७ सुरू झाल्यापासून ६० लाख प्रवाश्यांनी मेट्रोचा लाभ घेतला आहे.

एनडीआरएफचे निकष बदलले. सततच्या पावसामुळे ७५५ कोटी दिले. ४ हजार ७०० कोटी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिली. एकूण १२ हजार कोटींची नुकसान भरपाई दिली आहे. कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. मराठा आरक्षणाबाबत या सरकारने २ हजार ५०० पदांना नियुक्या देण्याचा निर्णय घेतला. आरक्षणासाठी सर्व प्रयत्न कोर्टात करत आहोत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT