‘चित्रा वाघांना रत्नागिरीत फिरू देणार नाही’, पतित पावन मंदिर भेटीच्या ‘ट्विट’वरून वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या ट्विटमुळे वाद निर्माण झालाय. चित्रा वाघ यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पतित पावन मंदिराला भेट दिली होती. त्याबद्दल त्यांनी काही फोटो शेअर करत ट्विट केलं होतं. त्या ट्विटमधील मजकूरावर रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर चित्रा वाघ यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीये.

ADVERTISEMENT

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनी 25 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौरा केला. रत्नागिरी दौऱ्यात त्यांनी शहरातील प्रसिद्ध पतित पावन मंदिराला भेट दिली होती. दर्शन घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं. याच ट्विटवरून सध्या वादाला तोंड फुटलं आहे.

पतित पावन मंदिराला भेट दिल्यानंतर चित्रा वाघ यांचं ट्विट काय?

“स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरीत बांधलेल्या प्रसिद्ध पतित पावन मंदिरात मनोभावे पूजा केली. प्रत्येक व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन परमेश्वराला स्पर्श करून पूजा करण्याचा हक्क व अधिकार देणारे भारतातील पहिले मंदिर”, असं चित्रा वाघ यांनी ट्विट करताना म्हटलं होतं.

हे वाचलं का?

कुमार शेट्ये, रुपाली सावंत यांचा आक्षेप काय?

श्रीमान भागोजी शेठ कीर यांनी बांधलेले पतित पावन मंदिर, असा उल्लेख करण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतित पावन मंदिरात जावून मूर्तीपूजा केली, असा उल्लेख केला. त्यामुळे भागोजी शेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माफी मागावी; अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही’, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी दिला आहे.

कुमार शेट्ये यांनी रत्नागिरीतल्या शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कुमार शेट्ये यांच्यासह काँग्रेसचे हारिस शेकासन, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, काँग्रेसच्या रुपाली सावंत, रमेश शहा हेही यावेळी उपस्थित होते. चित्रा वाघ यांनी माफी मागावी; अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही, अशी भूमिका उपस्थित असलेल्या सर्वांनीच मांडली.

ADVERTISEMENT

“चित्रा वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार”

‘चित्रा वाघ यांनी इतिसाहासाची मोडतोड करून खोटा इतिहास पसरवून लोकांच्या भावना दुखवण्याचं काम केलं आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे,” असं कुमार शेट्ये यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

‘भागोजी शेठ कीर यांचे कार्य हे महान असून, त्यांची तुलना कुठेही आणि कुणाशीही होवू शकत नाही. त्यामुळे भागोजी शेठ कीर यांचं कार्य नष्ट करून सावरकरांच्या नावावर खपवू नये’, असे कुमार शेट्ये, हारीस शेकासन यांनी म्हटलं आहे. ‘कोणतेही विधान करताना त्याचा पूर्वइतिहास माहिती करूनच इतिहास सांगावा, अन्यथा नाईलाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून देउ’, असा इशारा कुमार शेट्ये यांनी दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT